Homeताज्या बातम्याहातचलाखीने ज्वेलर्समधून दागिने लांबवणारी टोळी लोहगाव पोलिसांच्या जाळ्यात; ५ जणांना अटक, अडीच...

हातचलाखीने ज्वेलर्समधून दागिने लांबवणारी टोळी लोहगाव पोलिसांच्या जाळ्यात; ५ जणांना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे:
लोहगाव परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला लोहगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
​या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ व ३ (५) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर २०९/२०२६ दाखल करण्यात आला होता. ज्वेलर्स शॉपमधून चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनीषा पाटील यांनी तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे व पथकाला सूचना दिल्या होत्या.
​तपास पथकातील पोलीस अंमलदार शैलेश कुदळे आणि दादासाहेब बर्डे यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. त्यावेळी बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही चोरी कल्पना कांबळे व तिच्या साथीदारांनी केल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने सापळा रचून खालील पाचही आरोपींना ताब्यात घेतले:
​कल्पना अंकुश कांबळे (वय ४७ वर्षे, व्यवसाय- घरकाम, रा. सर्वे नं. १०६, गोसावी वस्ती, हडपसर, पुणे)
​पांडुरंग रामगायकवाड (वय ४२ वर्षे, रा. रुबीनगर, हनुमान मंदिरासमोर, निगडी, पिंपरी पुणे)
​दिक्षा वसंत शेलार (वय ३२ वर्षे, रा. रुबीनगर, हनुमान मंदिरासमोर, निगडी, पिंपरी पुणे)
​सुमन बाबासाहेब कोरके (वय ६२ वर्षे, रा. सर्वे नं. १०६, गोसावी वस्ती, हडपसर, पुणे)
​उत्तम बाबसाहेब कोरके (वय ४५ वर्षे, रा. मारळ गाव, गावदेवी मंदिराजवळ, शहाडगाव, कल्याण पश्चिम, ठाणे)
​ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील चांदीचे दागिने आणि गुन्ह्यासाठी वापरलेले चारचाकी वाहन जप्त केले आहे.
​कारवाई करणारे पोलीस पथक:
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ०७) श्री. अबिनाशकुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त (लोणीकंद विभाग) श्रीमती अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनीषा पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राकेश कदम यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, पोलीस अंमलदार अमित गायकवाड, दादासाहेब बर्डे, बाळासाहेब शिरसाठ, जोतीराम देवकाते, ज्ञानदेव आवारी, शैलेश कुदळे, प्रितम जंगम, बबलू भिसे आणि मोहन पालवे यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

error: Content is protected !!