Homeताज्या बातम्याबिबट्यांच्या भीतीने शेतकऱ्यांनी गळ्यात घातले खिळे असलेले कुत्र्याचे पट्टे — प्रशासन आणि...

बिबट्यांच्या भीतीने शेतकऱ्यांनी गळ्यात घातले खिळे असलेले कुत्र्याचे पट्टे — प्रशासन आणि राजकारणाची झोप अजूनही कायम!

बिबट्यांच्या भीतीने शेतकऱ्यांनी गळ्यात घातले खिळे असलेले कुत्र्याचे पट्टे — प्रशासन आणि राजकारणाची झोप अजूनही कायम!

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. अनेक ठिकाणी गुरेढोरे आणि लहान मुलांवर बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना समोर आल्या असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भीती इतकी वाढली आहे की, काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी गळ्यात खिळे असलेले कुत्र्याचे पट्टे घालणे सुरू केले आहे — जे पाहून राज्यभरातील समाजमन हादरले आहे.

या घटनेने ग्रामीण भागातील प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आणि राजकीय संवेदनशून्यतेचा भेदक आरसा समाजासमोर आणला आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी, आणि वनविभाग यांची झोप अजूनही कायम आहे.
जनतेच्या जीवावर उठलेल्या या भीषण समस्येकडे शासनाच्या पातळीवर गंभीरतेने पाहिले जात नाही, हे स्पष्टपणे जाणवते.

दरम्यान, या प्रसंगी सामाजिक माध्यमांवरही एक प्रश्न गाजू लागला आहे —

> “माणसांचं कुत्रं झालं पण राजकारण्यांमधल्या माणसाला काय जागं येईना…”

काँग्रेस असो, भाजप, राष्ट्रवादींचे दोन्ही गट असोत, शिवसेनेचे दोन्ही विभाजन असोत की मनसे किंवा इतर लहान पक्ष — सत्तेच्या खुर्चीवर कोण बसतो, याचाच विचार सर्वांना आहे.
शेतकरी, आदिवासी, ग्रामीण जनता यांच्या प्रश्नांकडे मात्र कोणीही ठोस पावले उचलताना दिसत नाही.

ज्या दिवशी हे सत्य सामान्य जनतेला उमजेल, त्या दिवशी ते या राजकीय लोकांकडून अति अपेक्षा ठेवणं बंद करतील, अशी भावना ग्रामीण जनतेत दिसून येते.

यात सर्वात कटू वास्तव म्हणजे — बिबट्यांचंही निवडलेलं बळी गरीब शेतकरीच असतो.

> “आमदार, खासदार, चेअरमन, उद्योगपती यांच्या वाटला बिबट्या जात नाही. गरीबाचीच कच्ची बच्ची खाईल…”

या शब्दांमध्ये दडलेला संताप आणि वेदना दोन्हीही गंभीर आहेत.
शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना न केल्यास ग्रामीण भागात अनर्थ घडू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, जंगल कमी होत असल्याने आणि विकासकामांच्या नावाखाली नैसर्गिक अधिवास उद्ध्वस्त झाल्याने बिबटे मानवी वस्त्यांमध्ये घुसत आहेत. परंतु अशा घटनांचा तोटा मात्र नेहमीच दुर्बल घटकांना सहन करावा लागतो.
शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला बिबट्या आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त करत ग्रामीण जनता म्हणते —

> “ज्या दिवशी बिबट्या एखाद्या राजकारण्याच्या घरातल्या माणसाला मारील, तोच दिवस या बिबट्यांचा शेवटचा दिवस असेल!”

📢 “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज” प्रशासन आणि सरकारकडे मागणी करते की —

1. ग्रामीण भागात वनविभाग, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्त पथके तयार करून तातडीने गस्त वाढवावी.

2. शेतकऱ्यांना सुरक्षेसाठी शासकीय पातळीवर साधनसामग्री (सेफ्टी जॅकेट, टॉर्च, अलार्म इ.) उपलब्ध करून द्यावी.

3. बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत पावलेल्या कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत व नोकरी द्यावी.

4. जंगल आणि मानवी वस्त्यांच्या सीमेवर “वन्यजीव संरक्षण भिंत” उभारण्याचा प्रकल्प हाती घ्यावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन...

​पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण तसेच सासवड व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने शिरूर...

पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद: व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे बदनामी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर...

सविस्तर वृत्त (प्रथम खबर अहवालानुसार) ​पुणे शहरातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची आणि तिच्या कुटुंबाची लैंगिक व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी तसेच...

error: Content is protected !!