पुणे:
केंद्र सरकारच्या “ड्रग मुक्त भारत” या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत तब्बल ४,११,९१,७६५/- रुपये किमतीच्या अंमली पदार्थांची कायदेशीर विल्हेवाट लावली आहे. घटकस्तरीय अंमली पदार्थ विल्हेवाट समितीच्या परवानगी व देखरेखीखाली शहरातील २३ पोलीस ठाण्यांमधील जप्त केलेल्या मुद्यामळाचा नाश करण्यात आला
आहे.
१२३ एन.डी.पी.एस. गुन्ह्यांमधील मुद्देमाल नष्ट
पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील २३ पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील एकूण १२३ एन.डी.पी.एस. गुन्ह्यांमध्ये गांजा, ओजीकुश गांजा, एम.डी., मेथाम्फेटामाईन, हेरॉईन, ब्राऊन शुगर, गर्द पावडर, चरस, हशिश ऑईल, अफिम/दोडाचुरा (पॉपीस्ट्रॉ), नेट्राझेपॅम आणि अल्प्राझोलम यांसारखे प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
दिनांक २५/०८/२०२६ रोजी “ड्रग डिस्पोजल कमिटी” यांच्या परवानगीनुसार अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर यांच्या সমक्ष रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC, Tal-Shirur, Dist- Pune) येथील शासनाने नियुक्त केलेल्या कारखान्यामध्ये या मुद्यामळाची विल्हेवाट लावण्यात आली.
नाश करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा तपशील:
गांजा: वजन ४२५ किलो ४७२ ग्रॅम ८२३ मि.ग्रॅम (किंमत ८५,०९,४५६/- रुपये)
ओजीकुश गांजा: वजन ००० किलो २०० ग्रॅम ००० मि.ग्रॅम (किंमत २०,००,०००/- रुपये)
एम.डी.: वजन ००१ किलो १५७ ग्रॅम २८६ मि.ग्रॅम (किंमत २,३१,४५,७२०/- रुपये)
मेथाम्फेटामाईन: वजन ००० किलो १२७ ग्रॅम ५०० मि.ग्रॅम (किंमत २५,५०,०००/- रुपये)
हेरॉईन: वजन ००० किलो ०६५ ग्रॅम ५०० मि.ग्रॅम (किंमत २२,९२,५००/- रुपये)
ब्राऊन शुगर: वजन ००० किलो ००४ ग्रॅम ४०० मि.ग्रॅम (किंमत १,५४,०००/- रुपये)
गर्द पावडर: वजन ००० किलो ००२ ग्रॅम ३४० मि.ग्रॅम (किंमत ८१,९००/- रुपये)
चरस: वजन ००० किलो १०० ग्रॅम ८७० मि.ग्रॅम (किंमत १०,०४,१९०/- रुपये)
हशिस ऑईल: वजन ००० किलो ०६५ ग्रॅम ०८० मि.ग्रॅम (किंमत ०६,५०,८००/- रुपये)
अफिम/दोडाचुरा (पॉपीस्ट्रॉ): वजन ०२४ किलो ८४७ ग्रॅम २०० मि.ग्रॅम (किंमत ०४,४४,४४४/- रुपये)
NETRAZEPM TABLET (10 mg) व Alprazolam TABLET (0.5 mg): वजन ००३ किलो २९६ ग्रॅम ४४७ मि.ग्रॅम (किंमत २,९६,६८०/- रुपये)
गांजा मिश्रीत तरंग गोळी: वजन ००० किलो ५०६ ग्रॅम ५०० मि.ग्रॅम (किंमत ५,०६५/- रुपये)
एकूण वजन व किंमत: ४५५ किलो ८४५ ग्रॅम ९४६ मि.ग्रॅम (एकूण किंमत ४,११,९१,७६५/- रुपये)
मार्गदर्शन व यशस्वी कामगिरी:
ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. हसन गौहर आणि साहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) श्री. शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे व श्री. जीवन माने, साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व अफरोज पठाण, पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर, साहाय्यक पोलीस फौजदार आशा भिंगारे व विठ्ठल साळुंखे, पोलीस अंमलदार संजयकुमार राजे, विशाल भिलारे, राहूल मद्देल, अमरनाथ लोणेकर, अमोल सरडे, अतूल क्षीरसागर, तुषार साळुंखे, मंगेश गुंड, अक्षय शिर्के, सुरेखा साबळे, सतिश चव्हाण, प्रशांत कळसकर, निंभोरे, शरद धांडे, गायकवाड, जोजारे, कुंभार, यादव, देवकाते, वांढरे, मुंढे तसेच महिला पोलीस अंमलदार सुकेशनी आंबले आणि आरती दिवेकर यांनी सहभाग घेऊन यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























