Homeताज्या बातम्याभारती विद्यापीठ हॉस्पिटलला रुग्ण हक्क संघर्ष समितीचा दणका: ४३ हजार रुपयांचे बिल...

भारती विद्यापीठ हॉस्पिटलला रुग्ण हक्क संघर्ष समितीचा दणका: ४३ हजार रुपयांचे बिल कमी करत महात्मा फुले योजनेतून केला मोफत उपचार

पुणे:
पुण्यातील नामांकित भारती हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीबाबत रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र, पुणे शाखेने यशस्वी पाठपुरावा करत एका गरीब गरजू रुग्णाला मोठा दिलासा दिला आहे. हॉस्पिटल प्रशासनाला धारेवर धरत रुग्णाचे ४३ हजार रुपयांचे बिल कमी करण्यात आले, तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून तब्बल १ लाख ७ हजार रुपयांची मदत मिळवून देत रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे रुग्णाला सुखरूप घरी सोडण्यात आले असून, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्ण हक्क संघर्ष समितीचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
​नेमकी घटना काय?
​भारती हे एक धर्मदाय (चॅरीटेबल) हॉस्पिटल असून, नियमानुसार येथे शासनाच्या सर्व आरोग्य योजना लागू आहेत. शासनाच्या नियमांनुसार पिवळ्या रेशनकार्ड धारकांना औषधोपचारासह पूर्णपणे मोफत उपचार मिळणे बंधनकारक आहे, तर केशरी रेशनकार्ड धारकांना ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार देणे बंधनकारक आहे. परंतु, प्रत्यक्षात अनेकदा रुग्णांना या नियमांचा लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास येते.
​सदर प्रकरणातही एका अत्यंत गरीब व गरजू रुग्णाला उपचारादरम्यान आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. याची गंभीर दखल घेत रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र, पुणेचे जिल्हासचिव किरण बदे यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांच्या मोलाच्या सहकार्याने आणि पाठपुराव्यामुळे संबंधित हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून १,०७,००० (एक लाख सात हजार रुपये) रुपयांची मदत उपलब्ध करून देण्यात आली. तसेच उर्वरित रकमेतून ४३,००० रुपयांचे बिल कमी करून घेण्यात आले. उपचारांनंतर आज रुग्णाला सुखरूप घरी पाठवण्यात आले आहे.
​गरजू रुग्णांना वेळेत उपचाराची हमी
​या सत्कार्यामुळे गरजू रुग्णाला वेळेत योग्य उपचार मिळणे शक्य झाले असून, समितीच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
​या संपूर्ण यशस्वी मोहिमेमध्ये आणि रुग्ण सेवेत रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्रचे खालील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते:
​संस्थापक अध्यक्ष: ॲड. विजयभाऊ पंडित
​सक्रिय पदाधिकारी: संजयभाऊ बावळेकर, अमर जाधव (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष), अमीर शेख, अमित मानकर, प्रशांत कुमावत, सागर उपासनी आणि राजू सुलाखे.
​गरजू व सर्वसामान्य रुग्णांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र, पुणे सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भव्य सायकल टूर मार्गांवर खड्डे दिसू लागल्याने कार्यकर्त्यांनी ऑडिटची मागणी केली. पुणे बातम्या

फर्ग्युसन कॉलेज रोडवर खड्डे पडले आहेत पुणे : या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या उद्घाटनाच्या भव्य सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्संचयित केल्यानंतर शहरातील अनेक...

कल्याणीनगर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन नवीन रस्ते जोडले. पुणे बातम्या

कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या.कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक...

NCW चेअरपर्सन महिलांना आर्थिक वाढीसाठी AI वापरण्याचे आवाहन करतात. पुणे बातम्या

विश्वकर्मा विद्यापीठाने राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेल्या यशोदा एआय 2.0 कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षा विजया रहाटकर, उपसंचालक रामावतार सिंग, जिल्हा ग्रामीण विकास...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. पुणे बातम्या

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

error: Content is protected !!