Homeताज्या बातम्याथेऊरमध्ये 'राईज अँड शाईन बायोटेक'ची मनमानी; शासकीय रस्ता व नागरिकांच्या घरांचे प्रचंड...

थेऊरमध्ये ‘राईज अँड शाईन बायोटेक’ची मनमानी; शासकीय रस्ता व नागरिकांच्या घरांचे प्रचंड नुकसान

​स्थानिकांचा संताप: कंपनी व ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी
सहसंपादक प्रसाद उर्फ बाप्पु सोनवणे
​पुणे (श्रीक्षेत्र थेऊर):
श्रीक्षेत्र थेऊर येथील ‘राईज अँड शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने विहीर खोदकामासाठी केलेल्या बेजबाबदार स्फोटकांमुळे परिसरातील नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले असून, शासकीय निधीतून बनवलेला रस्ताही उद्ध्वस्त झाला आहे. प्रशासनाने काम स्थगित करण्याचे आदेश देऊनही कंपनीने मनमानी कारभार सुरूच ठेवल्याने संतापलेल्या नागरिकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
​प्रशासकीय आदेशालाही कंपनीकडून केराची टोपली
​मिळालेल्या माहितीनुसार, सदर कंपनीने स्वतःच्या जागेत विहीर खोदण्याचे काम हाती घेतले होते. या खोदकामात मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा वापर करण्यात आला. या स्फोटकांमुळे झालेल्या हादऱ्यांनी आसपासच्या घरांना तडे गेले असून, काही घरांच्या छतावर दगड पडून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या त्रासाबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर, लोणी काळभोर येथील मा. अप्पर तहसीलदार यांनी सदर विहिरीचे काम त्वरित स्थगित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासकीय आदेशाला न जुमानता कंपनीने आणि संबंधित ठेकेदाराने काम सुरूच ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
​शासकीय निधीतून बनवलेला रस्ता झाला निकामी
​विहीर खोदकामासाठी वापरल्या जाणाऱ्या स्फोटकांचा फटका दत्तनगरकडे जाणाऱ्या रस्त्याला बसला आहे. शासकीय निधीतून बनवलेला हा रस्ता स्फोटकांमुळे ठिकठिकाणी खचला असून त्याला मोठे तडे गेले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार विनंती करूनही कंपनी प्रशासन आणि ठेकेदार या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
​नागरिकांचा इशारा: कारवाई करा, अन्यथा आंदोलन
​सदर कंपनी आणि ठेकेदाराच्या या हलगर्जीपणामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. कंपनीने तातडीने घरांचे झालेले नुकसान भरून द्यावे आणि निकामी झालेला शासकीय रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जर कंपनी आणि ठेकेदारावर कायदेशीर गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई दिली गेली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
​आता या प्रकरणावर प्रशासन नेमकी काय भूमिका घेते आणि संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई होते का, याकडे संपूर्ण थेऊर परिसराचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोशी बिल्डींग गुहा-इन साठी ट्रिगर: मुसळधार पाऊस, गळती आणि बांधकाम गुणवत्ता, तज्ञ म्हणतात |...

मोशीतील इमारतीच्या गुहेभोवती ७० फूट कचरा आहे पुणे : मोशीतील बुधवारच्या आपत्तीचा मागोवा घेणाऱ्या प्रत्येकाला हेच उत्तर जाणून घ्यायचे आहे की कचऱ्याच्या डोंगरापासून...

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांसोबत लाखो लोक भक्ती करत असताना पुण्याचा...

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे गुरुवारी सायंकाळी पुणे शहरात आगमन झाले. पुणे : पिंपरी चिंचवडच्या पावसाने भिजलेल्या आसमंतात गुरुवारी अंधुक पहाट पडताच, रंगीबेरंगी रांगोळ्यांनी...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला. पुणे बातम्या

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR. पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात. पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

मतदार यादी मोहीम घरोघरी जाते, प्रक्रिया गतिमान करण्यासाठी बीएलओ शिबिरे घेतात. पुणे बातम्या

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) व्यायामाचा काही भाग घरामध्ये...

error: Content is protected !!