Homeताज्या बातम्याराहुरीत नगर-मनमाड हायवेवर मराठा आंदोलनाने चक्काजाम; मनोज दादा जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा

राहुरीत नगर-मनमाड हायवेवर मराठा आंदोलनाने चक्काजाम; मनोज दादा जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा

क्राईम महाराष्ट्र न्यूज सहसंपादक शिवाजी दवणे
9730170965

मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या मनोज दादा जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी राहुरी शहरात आज (2 सप्टेंबर) सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले. नगर-मनमाड हायवेवर सकाळी 11 वाजल्यापासून हा जाम सुरू झाला.

“एक मराठा, लाख मराठा” च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनात रवी भाऊ मोरे, कांता पाटील तनपुरे, मुन्ना शेठ तनपुरे, राजू शेटे, युवा नेते सौरभ उंडे, ताराचंद पाटील तनपुरे, सचिन बोरुडे, सुनील निमसे, राऊ काका तनपुरे, राहुल भैया शेटे, बाळासाहेब उंडे,युवराज तोडमल, भिकू शेठ भुजाडी, भारत भुजाडी, गणेश उंडे, आदींसह अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. आंदोलकांनी शांततेत परंतु ठामपणे आपली मागणी मांडली.

कांता पाटील तनपुरे यांनी सरकारवर ताशेरे ओढत म्हटले, “सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ज्या गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारावर राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं — ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकून राहिलं होतं. मग आमचं आरक्षण तुम्ही का काढलं? हा अन्याय आम्ही सहन करणार नाही.”

प्रकाश देठे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करत सांगितले, “मराठा बांधवांनी केवळ रस्त्यावरच नव्हे, तर सोशल मीडियावर, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मार्गांनी आंदोलनास पाठिंबा द्यावा. मराठा आता थांबणार नाही. गनिमी काव्याने सुद्धा आंदोलन करावे लागले, तरी आम्ही मागे हटणार नाही.”

यावेळी सचिन बोरुडे, शिवसेना शेतकरी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष रवी मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

राहुरीमधील हे आंदोलन शांततेत पार पडले असून, सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अहमदाबाद सोडून मुंबईतच का होऊ शकते टीम इंडियाची विक्ट्री परेड? जाणून घ्या ५ महत्वाची...

अहमदाबाद सोडून मुंबईतच का होऊ शकते टीम इंडियाची विक्ट्री परेड? जाणून घ्या ५ महत्वाची कारणं पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; १० मार्च २०२६ : अहमदाबादच्या...

नोंदणी विभाग जिल्ह्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयातून भाडेकरू करारनामा क्लिअर करण्याचा विचार करतो. पुणे बातम्या

पुणे: राज्य मालमत्ता नोंदणी विभाग ऑनलाइन रजा आणि परवाना (भाडेकरू) करारनामे विशिष्ट तालुका कार्यालयांपुरती मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयाकडून मंजूर करण्याचा विचार...

उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; अधिकारी एसीमध्ये तर आंदोलनकर्ते उन्हात – दोन दिवसांपासून उपोषण सुरू

पुणे, दि. — पुणे शहरात सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाकडे प्रशासनाकडून गंभीर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दोन दिवसांपासून प्रखर उन्हात बसून आंदोलन...

मास कॉपी: संपूर्ण महाराष्ट्रात HSC आणि SSC परीक्षांमध्ये कॉपी करण्यास मदत करणाऱ्या शिक्षकांना, शाळेच्या...

पुणे: सध्या सुरू असलेल्या एचएससी आणि एसएससी परीक्षांमध्ये परीक्षेतील गैरप्रकारांची तब्बल 81 प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामुळे राज्यभरातील केंद्रांवर सामूहिक कॉपी आणि...

ब्रह्मकुमारी बोपोडी तर्फे महिला दिनानिमित्त डॉ. आम्रपाली मोहिते यांचा सन्मान

पुणे, दि. — जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ब्रह्मकुमारी केंद्र, बोपोडी यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!