पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात असताना, लोणीकंद पोलिसांनी गेल्या आठवड्यात धडाकेबाज कामगिरी केली आहे. अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून एकूण ६ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ३४,९८,८०० रुपये किमतीचे १७४.९५ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज (एम.डी) पावडर जप्त केली आहे.
पहिली कारवाई: कटकेवाडी फाटा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुनिता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार कैलास साळुंके व स्वप्नील जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार, दि. १९/०४/२०२६ रोजी कटकेवाडी फाटा येथून पुंजाजी जयचंद्र चौधरी (वय ४०, रा. वाघोली, मूळ- बुलढाणा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४,३७,२०० रुपयांचे २१.८६० ग्रॅम एम.डी. आणि आयफोन असा एकूण ४,८७,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई: पेरणे फाटा
दिनांक २०/०४/२०२६ रोजी पेरणे फाटा येथे पोलिसांनी सापळा लावून दोन जणांना अटक केली. यामध्ये:
१) राजेंद्र केरु टेळे (वय ३५, रा. शिक्रापूर)
२) करन सचिन मोहिते (वय २१, रा. सणसवाडी) यांचा समावेश आहे.
यांच्याकडून ५९.१६० ग्रॅम एम.डी. पावडर, एक कार, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १४,१०,९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तिसरी कारवाई: मगर वस्ती
अटक केलेल्या आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २२/०४/२०२६ रोजी मगर वस्ती, लोणीकंद येथून आणखी दोघांना अटक करण्यात आली.
१) भागीरथसिंग सज्जनसिंग राजपुरोहित (वय २८, रा. मांजरी, मूळ- राजस्थान)
२) आदिनाथ दशरथ शिर्के (वय २९, रा. मांजरी).
यांच्याकडून २१.४३० ग्रॅम एम.डी. आणि एक कार असा एकूण ८,३४,०२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
चौथी कारवाई: शिरवळ कनेक्शन
वरील पाचही आरोपींकडे एकत्रित तपास केल्यानंतर या साखळीतील सहावा आरोपी योगेश लक्ष्मण चव्हाण (वय ३७, रा. शिरवळ, जि. सातारा) याला दि. २३/०४/२०२६ रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून तब्बल ७२.५०० ग्रॅम एम.डी. पावडर (किंमत १४,५०,००० रुपये) जप्त करण्यात आली आहे.
एकूण जप्त मुद्देमाल:
या संपूर्ण मोहिमेत पोलिसांनी एकूण ३४,९८,८०० रुपये किमतीचे ड्रग्ज, दोन कार, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली आहे. सर्व सहा आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, अंमली पदार्थांचे हे जाळे नेमके कोठपर्यंत पसरले आहे, याचा अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























