Homeताज्या बातम्यालोणी काळभोर बोरकरवस्ती (ता. हवेली) येथे रिक्षा अपघात; गाईचे मांस सापडल्याने परिसरात...

लोणी काळभोर बोरकरवस्ती (ता. हवेली) येथे रिक्षा अपघात; गाईचे मांस सापडल्याने परिसरात खळबळ

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील बोरकरवस्ती परिसरात आज सकाळी घडलेल्या रिक्षा अपघातानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, रिक्षामध्ये गाईचे मांस सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित रिक्षा फलटण वरून कोंढव्याच्या दिशेने जात असताना अचानक नियंत्रण सुटल्याने टेम्पो ला जाऊन धडकली. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता रिक्षामध्ये संशयास्पद पिशव्या आढळून आल्या. त्या उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये गाईचे मांस असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच संबंधित मांस जप्त करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये सुरु आहे तसेच याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. नागरिकांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

‘सिया गोयलची विग टिप्पणी, जबरदस्ती लग्न, गुप्त संबंध’: केतन अग्रवाल खून प्रकरणात ट्विस्टनंतर ट्विस्ट....

पोलिसांनी केतन अग्रवालची मंगेतर, सिया गोयल (20) आणि तिचा कथित साथीदार, चेतन चौधरी (22) यांना अटक केली आहे, त्यांच्यावर 18 जून रोजी 25...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद; ६ गुन्हे उघडकीस, ४...

​पुणे, दिनांक २७ जून २०२६: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने वाघोली परिसरात धडक कारवाई करत मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका सक्रिय...

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

error: Content is protected !!