Homeताज्या बातम्यावडगाव बुद्रुकमध्ये पाटबंधारे विभागाची धडक कारवाई; चिमुकल्यांच्या आक्रोशात झाडतोडीचा पर्यावरणीय गुन्हा

वडगाव बुद्रुकमध्ये पाटबंधारे विभागाची धडक कारवाई; चिमुकल्यांच्या आक्रोशात झाडतोडीचा पर्यावरणीय गुन्हा

पुणे (प्रतिनिधी) –
सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक भागात कालवा लगत असलेल्या गोसावी वस्तीवर पाटबंधारे विभागाने मोठी कारवाई केली. दोन पोकलेन आणि एक जेसीबीच्या साहाय्याने वीसहून अधिक घरे पाडण्यात आली. या कारवाईदरम्यान चिमुकल्या मुलांच्या किंकाळ्या, महिलांचा आक्रोश आणि नागरिकांच्या अश्रूंनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मात्र या कारवाईत अनेक झाडांची बेकायदेशीर तोड झाल्याने आता पर्यावरणीय गुन्ह्याचा मुद्दा पुढे येत आहे.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, कारवाईदरम्यान पेरू, आंबा, सिताफळ, उंबर, चेरी आदी फळझाडांची निर्दय तोड करण्यात आली. ही झाडे वर्षानुवर्षे वाढवलेली असून कोणतीही परवानगी न घेता ती जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे वन विभाग आणि पर्यावरण विभागाकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

स्थानिक पत्रकार आमिर मोहम्मद शेख (Crime Maharashtra Live News) यांनी या घटनेबाबत वन विभाग व पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
ई-मेलद्वारे पाठवलेल्या तक्रारीत झाडतोडीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, पाटबंधारे विभागाचे अधिकारी या प्रकरणी मौन बाळगून आहेत. नागरिकांच्या घरांसोबत त्यांचे संसार आणि झाडे दोन्ही जमीनदोस्त झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली सरकारी कारवाईदरम्यान झाडे तोडली जाणे ही दुहेरी भूमिका असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

या घटनेमुळे वडगाव बुद्रुक परिसरातील हवा आणि हरित पट्ट्यावर गंभीर परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन...

​पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण तसेच सासवड व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने शिरूर...

पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद: व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे बदनामी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर...

सविस्तर वृत्त (प्रथम खबर अहवालानुसार) ​पुणे शहरातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची आणि तिच्या कुटुंबाची लैंगिक व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी तसेच...

error: Content is protected !!