Homeताज्या बातम्याविद्येच्या माहेरघरात मुले अंधारात – लाखोंचे लाईट बिल थकबाकी महानगरपालिका सुस्त- महाविकास...

विद्येच्या माहेरघरात मुले अंधारात – लाखोंचे लाईट बिल थकबाकी महानगरपालिका सुस्त- महाविकास आघाडी आक्रमक.

विद्येच्या माहेरघरात मुले अंधारात – लाखोंचे लाईट बिल थकबाकी
महानगरपालिका सुस्त- महाविकास आघाडी आक्रमक.

पुणे – विद्येचे माहेरघर, शिक्षणाची पंढरी, सांस्कृतिक राजधानी अशा अनेक उपमा लाभलेल्या पुणेकरांना लाजिरवाणी करणारी घटना नवी पेठ भागात घडली आहे. पुणे महानगरपालिका शाळा क्रमांक १७ धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय येथे तब्बल १३ ऑगस्टपासून वीज कापलेली असून शाळेतील विद्यार्थ्यांना अंधारात आणि पत्र्याच्या शेडमध्येच शिक्षण घ्यावे लागत आहे.

दरम्यान, शेजारीच असलेल्या अनधिकृत व्यायामशाळा व अभ्यासिका यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली पाठराखण आणि भ्रष्टाचारामुळे लाखोंचे थकीत वीजबिल वाढत गेले, आणि शेवटी शाळेची वीजच तोडण्यात आली. स्थानिकांनी, तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या तरी महापालिकेचे निर्ढावलेले अधिकारी ‘अजगरा’सारखे गप्प बसले, अशी तीव्र टीका करण्यात आली आहे.

पत्र्याच्या शेड मध्ये शिक्षकांना शिकवताना दिव्याचा उजेड नाही, पंखा नाही, आणि विद्यार्थ्यांना घुसमट व त्रास सहन करावा लागत आहे. महत्वाचे म्हणजे शाळेचे वरील दोन मजले धोकादायक आहेत असे दाखविण्यात आले आणि विद्यार्थ्यांना खाली हॉल मधे पत्र्याचे शेड मारून वर्ग भरविण्यात आले , आणि मनपा प्रशासनाने धोकादायक दाखवलेल्या मजल्यावरच नंतर २ वर्गांमधे सुशोभीकरण करून अभ्यासिका उभारली आहे प्रश्न हा आहे की हे कोणासाठी चालले आहे . ?

या प्रकरणावर संताप व्यक्त करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहर प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत म्हणाले –
“शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुणे शहरात मुले अंधारात शिकतात, ही पुणेकरांसाठी लाजिरवाणी बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने याची दखल घ्यावी, कारण हे प्रकरण सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या आशीर्वादामुळेच घडले आहे. पुण्याचे खासदार, आमदार लक्ष देत नाहीत” पुणेकरांना शिक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागेल अशी परिस्थिती भविष्यात येऊ शकते, भाजप नगरसेवकांच्या खाऊगिरी पणामुळे, भ्रष्टाचारामुळे शाळेवर हे दिवस आले आहेत.

तर काँग्रेसचे सागर धाडवे म्हणाले –
“गेल्या चार महिन्यांपासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. आधीच्या आणि आताच्या आयुक्तांना स्वतः भेटून तक्रार केली आहे. पण आयुक्त हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली असल्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वादाने शाळा अंधारात असताना अनधिकृत व्यायामशाळा आणि अभ्यासिका मात्र बेधडक सुरू आहेत.” सत्ताधारी भाजप नगरसेवकाचे कार्यकर्ते, पुणे मनपा मालमत्ता विभाग, शिक्षण मंडळ, महावितरण विभाग सर्वांनी मिळून हा भ्रष्टाचार केला असल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

विद्येच्या माहेरघरात आजही सामान्य घरातील मुलांना अंधारात शिक्षण घ्यावे लागत आहे, ही प्रशासनाच्या निष्क्रियतेची आणि भ्रष्टाचाराची चरम सीमा नाही का?
यावेळी शिवसेना प्रभाग प्रमुख संजय साळवी, संघटक निलेश वाघमारे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

error: Content is protected !!