Homeताज्या बातम्याशाळेच्या इमारतीवर घाटे नगरसेवकांचा ‘अनधिकृत ताबा’? वीजचोरीचाही आरोप;नगरसेवक मनीषा घाटे, धीरज घाटे...

शाळेच्या इमारतीवर घाटे नगरसेवकांचा ‘अनधिकृत ताबा’? वीजचोरीचाही आरोप;नगरसेवक मनीषा घाटे, धीरज घाटे *यांचा नवीन अनधिकृत प्रताप उघड युवक काँग्रेस ची कारवाईची मागणी

शाळेच्या इमारतीवर घाटे नगरसेवकांचा ‘अनधिकृत ताबा’? वीजचोरीचाही आरोप;नगरसेवक मनीषा घाटे, धीरज घाटे *यांचा नवीन अनधिकृत प्रताप उघड युवक काँग्रेस ची कारवाईची मागणी

पुणे,२ जुलै २०२५ –
पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातून माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या पत्रातून एक गंभीर आणि धक्कादायक बाब उघड झाली आहे. मा. नगरसेविका मनीषा घाटे व भाजप शहराध्यक्ष मा नगरसेवक धीरज घाटे यांनी पुणे मनपा शाळा क्र. ६५ (सर्जेराव साळवे विद्यालय, आंबील ओढा कॉलनी) येथील शासकीय इमारतींवर अनधिकृत ताबा मिळवला असून, वीजचोरी केल्याचा आरोपही यामध्ये स्पष्टपणे मांडण्यात आला आहे.
यासंदर्भात महावितरण च्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता पेशवे पार्क उपविभाग कार्यालय यांस तक्रार देण्यात आली आहे.

*सदर माहिती, २७ मे २०२५ रोजी पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या जावक क्र. २२ या पत्रातून प्राप्त झाली आहे. यामध्ये नमूद आहे की, आंबील ओढा येथील शाळा क्रमांक ६५ मधील दोन मजली इमारतीतील एकूण तीन खोल्यांची चावी मा नगरसेवक श्रीमती मनीषा घाटे, श्री धीरज घाटे यांकडे आहे.* त्या खोल्यांमध्ये अभ्यासिका, संगणक कक्ष आणि वर्गखोल्यांचे स्वरूप तयार करून खासगी वापर सुरू आहे.

सदर इमारतीत एकूण ५० खुर्च्या, ४० अभ्यासिका कंपार्टमेंट्स, संगणक व विजेची सोय असून, मनपाच्या कोणत्याही परवानगीशिवाय या खोल्या वापरण्यात आल्या आहेत. विद्युत वापरासंदर्भात कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याने महावितरणच्या कायद्यानुसार (कलम १३५/१२६) सदर बाब वीजचोरी ठरते.
याप्रकरणी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर धाडवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “शाळेच्या नावावर बांधलेल्या इमारतींवर राजकीय दबाव वापरून ताबा मिळवणे आणि विना परवाना वापर सुरू ठेवणे हा गुन्हा आहे. या संदर्भात प्रशासकीय कारवाईची आम्ही मागणी करीत आहोत.”
“शाळा क्रमांक ६५ आणि १७ या दोन्ही ठिकाणी वीजचोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये मालमत्तेचा अनधिकृत ताबा व शासकीय मालमत्तेचा गैरवापर असून, पुणे मनपाचे प्रशासन, क्षेत्रीय अधिकारी आणि महावितरण यांनी यामध्ये ‘सहकार्य’ केल्याचा संशय आहे. कायदेशीर कारवाई होईल की प्रशासन राजकीय दबावाखाली झुकणार, हे पाहणे गरजेचे आहे.” कारण महावितरण चे अधिकारी या प्रभागात वीजचोरांना साथ देत असल्याचे दिसत आहे आणि सामान्य माणसाला ५०० ₹ वेळेत न भरल्या वीजतोड करीत आहेत.
या संदर्भात यासंदर्भात पुणे महानगरपालिका मालमत्ता विभाग व शिक्षण विभाग अद्याप मौन बाळगत असल्याचे दिसून येते. नागरिक, राजकीय पक्ष व समाजसेवक आता या प्रकरणात कायद्यानुसार ठोस कारवाई होईल का, याकडे लक्ष ठेवून आहेत.

सदर प्रकरणात खालील प्रमाणे कायदेशीर कलमानुसार कारवाई करावी अशी मागणी युवक काँग्रेस चे सागर धाडवे यांनी महावितरण ला आणि पुणे मनपा ला निवेदनात केली आहे :
• IPC कलम 441 व 447 – अनधिकृत प्रवेश व अतिक्रमण
• Public Premises Act, 1971 – सार्वजनिक मालमत्तेचा अनधिकृत वापर
• वीज अधिनियम कलम १२६ – बेकायदेशीर वीज वापर व वीजचोरी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तरुण एक्सोप्लानेट स्पॉटेड शेडिंग वातावरण तारांकित रेडिएशन अंतर्गत

हबल स्पेस टेलीस्कोपच्या डेटासह नासाच्या चंद्र एक्स-रे वेधशाळेने, एक “बाळ” एक्सोप्लानेटचे वातावरण वेगाने गमावले आहे. टीओआय १२२27 बी नावाचा ग्रह, एक अस्पष्ट लाल बौने...

सॅमसंग गॅलेक्सी एस 25 फे, गॅलेक्सी टॅब एस 11 अल्ट्रा लीक रेंडर सुचवितो

सॅमसंग गॅलेक्सी एस 25 एफई लॉन्च जवळ येऊ शकते कारण त्याचे रेंडर ऑनलाईन समोर आले आहे, ज्यामुळे फोनची संभाव्य रचना उघडकीस आली आहे. गळतीमध्ये...

❝कर्तव्यात कसूर करणाऱ्या बीट अंमलदारांवर निलंबनाची मागणी; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा❞

वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांची तहसीलदार कार्यालयात निवेदनाद्वारे मागणीराहुरी (तालुका प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील बीट अंमलदार बाबासाहेब भागा शेळके...

गूगलने जेमिनी 2.5 प्रो आणि सखोल शोध शोधात एआय मोडमध्ये आणले, सशुल्क ग्राहकांना उपलब्ध

गूगलने बुधवारी शोधात त्याच्या एआय मोड साधनासाठी नवीन वैशिष्ट्ये जाहीर केली. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)-चालित शोध अनुभवासाठी दोन नवीन अपग्रेड्स आता सशुल्क ग्राहकांना उपलब्ध आहेत,...

चीन-निर्मित प्रदर्शनासह आयफोन मॉडेल्समध्ये अमेरिकेत बंदी घालण्याचा सामना करावा लागतो; Apple पल म्हणतात ‘नाही...

ओएलईडी पॅनेलवरील व्यापाराच्या रहस्ये उल्लंघन केल्यामुळे चीनच्या बीओई प्रदर्शनासह सॅमसंग कायदेशीर लढाईत गुंतले आहे. अलीकडेच अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार आयोगाने (आयटीसी) एक प्राथमिक निर्णय जारी...

error: Content is protected !!