Homeताज्या बातम्याशिवसेनेच्या उमेदवार निवड प्रक्रियेला जोरदार सुरुवात पहिल्याच दिवशी मुलाखतींचा झंझावात; ४१ प्रभागांतून...

शिवसेनेच्या उमेदवार निवड प्रक्रियेला जोरदार सुरुवात पहिल्याच दिवशी मुलाखतींचा झंझावात; ४१ प्रभागांतून ३३६ इच्छुकांची उपस्थिती

शिवसेनेच्या उमेदवार निवड प्रक्रियेला जोरदार सुरुवात
पहिल्याच दिवशी मुलाखतींचा झंझावात; ४१ प्रभागांतून ३३६ इच्छुकांची उपस्थिती

पुणे | प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवड प्रक्रियेला भक्कम सुरुवात झाली आहे. नाना पेठ येथील शिवसेना संपर्क कार्यालयात काल व आज दोन दिवस चाललेल्या या मुलाखतींना शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिवसेना संपर्क प्रमुख सचिन भाऊ अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रक्रियेत पुणे शहरातील सर्व ४१ प्रभागांतून एकूण ३३६ इच्छुक उमेदवारांनी आपली मुलाखत दिली. त्यापैकी पहिल्याच दिवशी २४ प्रभागांतून १५६ इच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मुलाखतींसाठी शिवसेना सहसंपर्क प्रमुख आदित्यजी शिरोडकर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक वसंत मोरे, माजी शहरप्रमुख रामभाऊ पारिख, प्रशांत बधे तसेच कार्यालयीन सचिव मकरंद पेठकर यांनी सकाळपासून विशेष मेहनत घेतली.
संपूर्ण शहरातून वाजत-गाजत शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपर्क कार्यालयात अत्यंत ऊर्जात्मक व सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, या प्रक्रियेमुळे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षसंघटना अधिक बळकट करण्यावर शिवसेनेचा ठाम भर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उर्वरित प्रभागांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पुढील टप्प्यात घेण्यात येणार असून, या प्रक्रियेला शिवसैनिकांकडून सातत्याने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​पुण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; पोलीस संचलन मैदानात दिमाखदार संचलन आणि गौरव सोहळा

​पुणे: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोमवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता शिवाजीनगर येथील...

महाराष्ट्रात आजपासून मतमोजणी सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न | पुणे बातम्या

डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात. पुणे बातम्या

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

MSRTC कँटीन 1 जूनपासून चहा, नाश्ता 40 रुपये दराने विकणार: सरनाईक | पुणे बातम्या

पुणे: अखिल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कॅन्टीनमध्ये 1 जून 2026 पासून चहा आणि नाश्ता 40 रुपये दराने विकला जाईल, अशी घोषणा राज्याचे...

यापुढे पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध निवडणूक लढवणार नाही, असे सुप्रिया म्हणाल्या. पुणे बातम्या

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सप) कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी जाहीर केले की, पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध मी...

error: Content is protected !!