Homeताज्या बातम्याराज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या स्पर्धेत पटकावली दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदके; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी!
नाशिक येथे पार पडलेल्या स्पर्धेत पटकावली दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदके; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

राजगुरूनगर; दि. २३ (शशिकांत पाटोळे) : नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या ७ व्या राज्यस्तरीय मास्टर्स गेम्स २०२६ स्पर्धेत खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथील सौ. चैताली रुपेश पाटोळे यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ३५+ वयोगटात खेळताना त्यांनी दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावून आपल्या गावासह संपूर्ण तालुक्याचा झेंडा राज्यस्तरावर फडकावला आहे.

चैताली पाटोळे या राजगुरूनगर सहकारी बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असून, पंढरपूर दिंडी सोहळ्याचे माजी अध्यक्ष तसेच राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी कर्तव्यदक्ष अधिकारी श्री. शांताराम श्रीपती पाटोळे यांच्या त्या सुनबाई तर श्री. रुपेश शांताराम पाटोळे यांच्या पत्नी आहेत. नोकरी आणि घरची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत त्यांनी या स्पर्धेसाठी अत्यंत जिद्दीने सराव केला होता.

*स्पर्धेतील त्यांची उल्लेखनीय कामगिरी खालीलप्रमाणे :*

*• १०० मीटर हर्डल्स :* सुवर्णपदक
*• लांब उडी :* सुवर्णपदक
*• १५०० मीटर धावणे :* रौप्यपदक

इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतीही जबाबदारी यशाच्या आड येत नाही, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. आजच्या तरुणी आणि महिलांसाठी त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व पाटोळे वडगावचे माजी उपसरपंच सागरशेठ काळूराम पाटोळे यांनी सौ. चैत्राली पाटोळे यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.

ग्रामस्थांच्या वतीने सरपंच श्री. कुमार रमेश गायकवाड, उपसरपंच सो. अर्चना बाजीराव गायकवाड, खजिनदार श्री. नवनाथ पाटोळे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने विशेष कौतुक करून सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई ​पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२६: पुणे शहरातील गुन्हे शाखा...

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान पुणे : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना-युवासेना पुणे शहराच्या...

error: Content is protected !!