Homeताज्या बातम्यादुर्गनिर्मितीतून शिवरायांच्या इतिहासाला उजाळा; साक्षी-रोहनची प्रथम क्रमांकावर मोहोर’’

दुर्गनिर्मितीतून शिवरायांच्या इतिहासाला उजाळा; साक्षी-रोहनची प्रथम क्रमांकावर मोहोर’’

‘’दुर्गनिर्मितीतून शिवरायांच्या इतिहासाला उजाळा; साक्षी-रोहनची प्रथम क्रमांकावर मोहोर’’

कोलवडी-साष्ठे (ता. हवेली) : येथील शिवशंभू स्मारक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘किल्ले बनवा’ स्पर्धेत स्पर्धकांनी विविध ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारत शिवकालीन इतिहासाला उजाळा दिला. या स्पर्धेत व्यक्तीगत व सामूहिक अशा दोन गटांत २२० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

व्यक्तिगत गटात साक्षी मोरे व रोहन मोरे यांनी साकारलेल्या ‘रायगड’ किल्ल्याने प्रथम क्रमांक पटकाविला. वेदांती गायकवाड यांनी बनविलेल्या ‘साल्हेर’ किल्ल्याने द्वितीय, तर सृष्टी कदम यांनी साकारलेल्या ‘सिंधुदुर्ग’ किल्ल्याने तृतीय क्रमांक मिळविला.

सामूहिक गटात रवळेकर वस्ती येथील ‘विघ्नहर्ता ग्रुप’ यांनी साकारलेल्या ‘सिंहगड’ किल्ल्याने प्रथम क्रमांक मिळविला. भालसिंग वस्ती येथील ‘श्रीमंत भैरवनाथ प्रतिष्ठान’ यांनी बनविलेल्या ‘जिंजी’ किल्ल्याने द्वितीय, तर गायकवाड वस्ती येथील ‘राजमुद्रा ग्रुप’ यांनी साकारलेल्या ‘प्रतापगड’ किल्ल्याने तृतीय क्रमांक पटकाविला.

स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी विविध किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारत त्यांची ऐतिहासिक माहिती, रचना व आकर्षक सजावटीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जिवंत केला. सर्वच स्पर्धकांनी उत्कृष्ट कलाकृती सादर केल्याने स्पर्धेत चुरस पाहायला मिळाली.

दरम्यान, शिवशंभू स्मारक समितीच्या वतीने सर्व सहभागी स्पर्धकांसाठी धर्मवीर गड येथे दुर्ग अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे बालवयातच मुलांमध्ये गडकिल्ल्यांविषयी आवड, ऐतिहासिक वारशाची जाणीव आणि दुर्गसंवर्धनाची प्रेरणा निर्माण होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जयेश कंद यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; सरपंचपदासाठी निवडणूक लढविण्याची घोषणा! गावाच्या सर्वांगीण विकासासाठी...

जयेश कंद यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; सरपंचपदासाठी निवडणूक लढविण्याची घोषणा! गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; संघर्षातून विकासाकडे, विजययुद्धाकडे वाटचाल करण्याचा निर्धार.. प्रसाद सोनवणे. तालुका प्रतिनिधी : लोणीकंद...

पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; मार्केटयार्ड परिसरातून ७ लाखांहून अधिकचा मुद्देमाल...

पुणे शहर: पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ ने एका कारवाईत मॅफेड्रोन (एम.डी.) विक्रेत्यांवर छापा टाकत तब्बल ७,०५,४२९/- रुपये...

खडक पोलीस ठाण्याची धडाकेबाज कामगिरी: २५ दिवसांत १०,००० किमीहून अधिक प्रवास करून उत्तर प्रदेशातून...

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या खडक पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अपहाराच्या गुन्ह्याचा तपास करत पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अपहार केलेल्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी...

आळंदी नगर परिषद परिसरात रक्तरंजित थरार; दोन हल्लेखोरांकडून तरुणावर हल्ला

पुणे; दि. १३ (शशिकांत पाटोळे) : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहर दिवसेंदिवस रक्तरंजित ठरत आहे. पुण्यातील कोयता गँगची दहशत सगळ्यांनाच माहित आहे....

पुण्यातील विमाननगर परिसरात फटाके वाजवण्यावरून झालेल्या वादातून अमन समीर शेख (वय २२) या तरुणाचा...

पुण्यातील विमाननगर परिसरात फटाके वाजवण्यावरून झालेल्या वादातून अमन समीर शेख (वय २२) या तरुणाचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी खुनाचा...

error: Content is protected !!