“स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार” २०२५-२६ महाराष्ट्रातून ‘राज्यातील स्वच्छ शहर’ या क्षणीत पिंपरी चिंचवड शहराने पटकावला प्रथम क्रमांक!
दिल्ली; दि.१२ (शशिकांत पाटोळे) : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयामार्फत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
१० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात पिंपरी-चिंचवड हे राज्यातील सर्वात स्वच्छ शहर ठरले असून, राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता पुरस्कारानेही महापालिकेचा गौरव करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा…
• नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी हा दिमाखदार सोहळा पार पडला. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
• पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे आणि महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगळ हे देखील उपस्थित होते.
• या कार्यक्रमाला केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्री मनोहर लाल खट्टर, राज्यमंत्री तोखन साहू आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवडच्या यशाची प्रमुख कारणे..
• कचरा वर्गीकरण आणि संकलन : महापालिकेने कचरा निर्मितीच्या ठिकाणीच ओला, सुका, सॅनिटरी आणि घरगुती घातक कचरा वेगळा गोळा करण्याची प्रभावी यंत्रणा राबवली आहे.
• वैज्ञानिक प्रक्रिया आणि आरआरआर (RRR) केंद्रे : संकलित केलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्यातून उपयुक्त संसाधने निर्माण केली जात आहेत. तसेच ‘रिड्यूस, रियूज, रिसायकल’ (RRR) केंद्रांच्या माध्यमातून जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करण्यास प्रोत्साहन दिले गेले.
• स्वच्छतादूत आणि लोकसहभाग : स्वच्छता केवळ शासकीय मोहिमेपुरती मर्यादित न ठेवता ती नागरिकांच्या दैनंदिन सवयीचा भाग बनवण्यावर भर दिला गेला. विविध गृहनिर्माण सोसायट्या, स्वयंसेवी संस्था (NGOs), महापालिकेचे विभाग आणि सर्व ऋतूंमध्ये अविरत काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे हे यश शक्य झाले असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























