केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त औंधमध्ये भव्य रक्तदान शिबिर; जनसंपर्क कार्यालयाचेही उत्साहात उद्घाटन
पुणे, औंध-बोपोडी दि.५ (शशिकांत पाटोळे) : केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून औंधरोड येथील ‘गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाढदिवसाचा बडेजाव न करता सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत
आहे.
केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांनी या रक्तदान शिबिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः रक्तदात्यांशी संवाद साधत त्यांच्या या अमूल्य योगदानाचे कौतुक केले व त्यांचे आभार मानले. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना सन्मानपत्र (सर्टिफिकेट) देऊन गौरविण्यात आले.
“रक्तदान हे केवळ दान नसून गरजू रुग्णांना जीवनदान देणारे महान कार्य आहे,” असे मनोगत यावेळी व्यक्त करत ना. मोहोळ यांनी सर्व रक्तदात्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले.
जनसंपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन
याच सुवर्णक्षणाचे औचित्य साधून मा. सपनाताई छाजेड नगरसेविका यांच्या नवीन ‘जनसंपर्क कार्यालयाचे’ उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री ना. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी हे कार्यालय हक्काचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
मान्यवरांची मांदियाळी
या दुहेरी सोहळ्याला पुण्याचे उपमहापौर मा. परशुराम वाडेकर, नगरसेवक मा. सन्नीदादा निम्हण, नगरसेविका मा. भक्तीताई गायकवाड, माजी नगरसेवक मा. आनंद छाजेड, नगरसेविका मा. सपनाताई छाजेड, तसेच गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा. वैभव प्रभाकर, मा. सचिन वाडेकर आणि सामाजिक कार्यकर्ते मा. राज निर्भवणे, मा. बाळासाहेब सोरटे यांच्यासह परिसरातील अनेक स्थानिक पदाधिकारी, छाजेड कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदानाचा सामाजिक संदेश आणि जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनसेवेचा नवा संकल्प अशा दुहेरी उद्देशाने संपन्न झालेल्या या सोहळ्यामुळे औंध-बोपोडी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























