Homeताज्या बातम्यादिवाळीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाचे संवेदनशील स्थळांवर विशेष लक्ष आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाचे संवेदनशील स्थळांवर विशेष लक्ष आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी विशेष पथकामार्फत शहरभर गस्त; २५० कर्मचाऱ्यांसह संपूर्ण अग्निशमन यंत्रणा सज्ज

पिंपरी, दि. ७ नोव्हेंबर २०२६:* दिवाळीचा सण आनंदात आणि सुरक्षित वातावरणात साजरा करता यावा, तसेच सणाच्या कालावधीत आगीच्या संभाव्य दुर्घटना टाळता याव्यात, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.

उप आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या या विशेष मोहिमेचे नेतृत्व उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले व श्रीकांत वैरागर करत असून सदर मोहिमेसाठी अग्निशमन विभागाचे २५० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच २० मोठी अग्निशमन वाहने आणि ७ ते ८ वाहनांच्या माध्यमातून शहरभर गस्त घालण्यात येणार आहे. शहरातील गर्दीची ठिकाणे, संवेदनशील परिसर आणि आगीच्या घटना घडण्याची शक्यता असलेल्या सुमारे २२ स्थळांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

दिवाळीच्या कालावधीत फटाक्यांची आतषबाजी, विद्युत रोषणाई, दिव्यांचा वापर तसेच बाजारपेठांमधील वाढती गर्दी यामुळे आग लागण्याच्या घटनांची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत विशेष दक्षता घेण्यात येत आहे. मागील वर्षी दिवाळीदरम्यान आगीच्या सुमारे ७० घटना घडल्या होत्या. या घटनांचा अभ्यास करून संभाव्य धोके लक्षात घेण्यात आले असून, त्यानुसार शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करून विशेष लक्ष ठेवण्यासाठी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

अग्निशमन विभागातील सर्व कर्मचारी दोन शिफ्टमध्ये कार्यरत राहणार असून, शहरातील अग्निशमन केंद्रांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या कालावधीत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी २४ तास यंत्रणा कार्यरत ठेवण्यात येणार आहे. शहरात नियमित गस्त घालण्यासाठी लहान अग्निशमन वाहने तसेच आग लागल्यास तातडीने घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रित करण्यासाठी मोठी वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत.

शहरातील शगुन चौक, फुगेवाडी, पिंपळे गुरव, लांडगे नाट्यगृह परिसर, मॅगझिन चौक, त्रिवेणीनगर, तापकीर चौक, चिंचवड लिंक रोड, वाकड, दत्त मंदिर रस्ता, डांगे चौक, जगताप डेअरी, रावेत आणि मुकाई चौक यांसह शहरातील विविध संवेदनशील स्थळांवर अग्निशमन विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. या परिसरांमध्ये नियमित गस्त, परिस्थितीचा आढावा आणि आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

*नागरिकांनी घ्यावयाची अग्निसुरक्षेची काळजी:*

दिवाळीच्या काळात आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी पुढील खबरदारी घ्यावी, असे आवाहन अग्निशमन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

– गर्दीच्या भागात, इमारतींच्या जवळ किंवा वाहनांच्या आसपास फटाके फोडू नयेत.
– फटाका पेटवल्यानंतर तो न फुटल्यास पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये.
– नायलॉन किंवा सिंथेटिक कपड्यांऐवजी सुती कपडे परिधान करावेत.
– ज्वलनशील वस्तू, गॅस सिलिंडर, विद्युत तारा तसेच पेट्रोल किंवा डिझेलच्या जवळ फटाके फोडू नयेत.
– फटाके फोडताना सुरक्षित अंतर राखावे आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी.
– ज्वलनशील पदार्थांचा साठा असलेल्या ठिकाणी फटाके उडवू नयेत.
– फटाके फोडताना जवळ पाण्याची बादली किंवा अग्निसुरक्षेसाठी आवश्यक साधने ठेवावीत.
– फटाक्यांचा साठा घरात, वाहनांमध्ये किंवा कचऱ्याजवळ ठेवू नये.
– आग लागल्यास स्वतः आग विझविण्याचा प्रयत्न न करता तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा.

दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असून, नागरिकांनी अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन करून स्वतःसह कुटुंबीयांची आणि परिसरातील इतर नागरिकांची सुरक्षितता जपावी. खबरदारी आणि जबाबदारीच्या माध्यमातून दिवाळीचा सण सुरक्षितपणे साजरा करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
……….

*पिंपरी-चिंचवडमधील अग्निशमन केंद्रांचे संपर्क क्रमांक*

१. पिंपरी (मुख्य) – ९९२२५०१४७५

२. भोसरी – ९९२२५०१४७६

३. प्राधिकरण – ९९२२५०१४७७

४. रहाटणी – ९९२२५०१४७८

५. चिखली – ८६६९८९४१०१

६. तळवडे – ९५५२५२३१०१

७. थेरगाव – ७०३०९०७९९९

८. मोशी – ७२६४९४३३३३

९. चोवीसावाडी – ७७५८९९२८१७

१०. नेहरूनगर – ८४८४८८४१०१
………

*कोट:*

“दिवाळीच्या काळात नागरिकांची सुरक्षितता ही महानगरपालिकेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन विभागाला आवश्यक मनुष्यबळ आणि साधनसामग्रीसह सज्ज ठेवण्यात आले आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनीही सहकार्य करून सुरक्षिततेचे नियम पाळावेत आणि आनंदी व सुरक्षित दिवाळी साजरी करावी.”

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

……….

*कोट:*

“दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षातील घटनांचा अभ्यास करून शहरातील २२ संवेदनशील ठिकाणे निश्चित केली आहेत. २५० कर्मचारी, २० मोठी अग्निशमन वाहने आणि गस्ती वाहनांद्वारे २४ तास गस्त घालण्यात येणार आहे. नागरिकांनीही फटाके फोडताना आवश्यक खबरदारी घ्यावी आणि कोणतीही दुर्घटना घडल्यास तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा.”

– व्यंकटेश दुर्वास, मुख्य अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खेडमधील मोक्का गुन्ह्यातील दीड वर्षापासून फरार असलेले दोन सराईत गुन्हेगार जेरबंद

पुणे: खेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर स्वरूपाच्या मोक्का गुन्ह्यामध्ये गेल्या दीड वर्षापासून फरार असलेले दोन सराईत गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. स्थानिक गुन्हे...

पिंपरी येथील ‘सावली’ निवारा केंद्रात आयुक्तांची अनोखी दिवाळी; बेघर व्यक्तींसोबत साधला आपुलकीचा संवाद!

पिंपरी, ७ नोव्हेंबर २०२६ : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आप्तस्वकीयांसोबत साजरा होणारा जिव्हाळ्याचा सण. मात्र, ज्यांच्या आयुष्यात नात्यांची साथ हरवली आहे आणि ज्यांच्या वाट्याला...

पुणे महानगरपालिकेकडून ध्वनी व वायू प्रदूषण नियंत्रणाबाबत सक्त आवाहन; फटाक्यांच्या निर्मिती, विक्री व वापरावर...

​पुणे, दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६: पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी पर्यावरण विभाग आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यातर्फे एक महत्त्वाची जाहीर सूचना जारी करण्यात आली...

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये उपचार सुरू; सुप्रिया सुळे

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये उपचार सुरू; सुप्रिया सुळे मुंबई, दि.५ (शशिकांत पाटोळे) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ...

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त औंधमध्ये भव्य रक्तदान शिबिर; जनसंपर्क कार्यालयाचेही उत्साहात...

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त औंधमध्ये भव्य रक्तदान शिबिर; जनसंपर्क कार्यालयाचेही उत्साहात उद्घाटन पुणे, औंध-बोपोडी दि.५ (शशिकांत पाटोळे) : केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर...

error: Content is protected !!