पुणे (प्रतिनिधी): दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हडपसर परिसरात झालेल्या एका मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट ६ ला मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एका सराईत आरोपीला अटक करून त्याच्याकडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ३८,५४,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
घटनेचा तपशील:
दिनांक ०९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ०१:३० ते सकाळी ०७:३० वाजेच्या सुमारास, हडपसर येथील नेताजी सुभाष गृहरचना सोसायटीतील एका बंद घराच्या देवघराच्या खिडकीवाटे अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. देवघरात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४७,१९,०००/- (सत्तेचाळीस लाख एकोणीस हजार रुपये) किमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७२७/२०२६, भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३०५ (अ), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश वरिष्ठांनी गुन्हे शाखेच्या युनिट ६ ला दिले होते.
तपास आणि अटक:
युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री. संतोष शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संतोष कदम, पोलीस उपनिरीक्षक श्री. आशिष जाधव आणि पथकाने सलग १० दिवस या गुन्ह्याचा कसून तपास केला. तांत्रिक विश्लेषण, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी रोहित उर्फ पिल्या प्रविण पवार (वय २५ वर्षे, रा. म्हातोबाची आळंदी, सिताबाई मंदिराजवळ, ता. हवेली, जि. पुणे) याची ओळख पटवली.
हा आरोपी त्याच्या राहत्या गावी म्हातोबाची आळंदी येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार संतोष राठोड यांना मिळाली. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक श्री. संतोष शेटे यांना कळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सापळा रचला आणि आरोपीचा पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली.
हस्तगत केलेला मुद्देमाल:
अटक केल्यानंतर आरोपीकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ७,५४,०००/- रुपये रोख रक्कम आणि २५.१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, असा एकूण ३८,५४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या पथकाने केली कामगिरी:
ही यशस्वी कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री. संतोष शेटे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. संतोष कदम, पोलीस उपनिरीक्षक श्री. आशिष जाधव, सहा. पोलीस उपनिरीक्षक अरुणा म्हेत्रे, तसेच पोलीस अंमलदार नानासाहेब मोरे, प्रशांत कर्णवर, सतिश वणवे, अमित सस्ते, झाकिर पठाण, समीर पांडुळे, अमित कांबळे, आश्विनी गायकवाड, अनिल जामगे, संभाजी गायकवाड, गणेश माने, अक्षय बांदल आणि संतोष राठोड यांनी ही कारवाई पार पाडली.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























