दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई
पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२६:
पुणे शहरातील गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने सापळा रचून दुकानांचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना जेरबंद केले आहे. या आरोपींनी तळेगाव दाभाडे, लोणावळा शहर आणि सासवड परिसरातील एकूण १० दुकाने फोडल्याची कबुली दिली आहे.
कशी झाली कारवाई?
मा. वरिष्ठांच्या आदेशानुसार दिनांक २०/११/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ०१ चे पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाई तसेच पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, पोलीस अंमलदार सचिन कोळी व किरण मोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी करणारा रेकॉर्डवरील आरोपी हर्षद रामु पवार आणि त्याचा साथीदार मंगेश उर्फ सोन्या विजय चव्हाण यांनी इतर साथीदारांसह अनेक ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केले आहेत.
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट १, श्री. दिपक लगड यांना देण्यात आली. त्यांनी खात्री करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने खाजगी वाहनाने दारुवाला पूल शेजारी सापळा रचला. आरोपी त्या ठिकाणी आल्याचे दिसताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. प्रथम त्यांना स्टाफची ओळख सांगून नाव व पत्ता विचारण्यात आला.
अटक करण्यात आलेले आरोपी
चौकशीत आरोपींनी आपली माहिती खालीलप्रमाणे सांगितली:
1. साजन ऊर्फ हर्षद रामु पवार (वय २५ वर्षे, धंदा बेकार, रा. मोजे आळी, तुकाराम मंदिराजवळ, विमाननगर लोहगाव, पुणे)
2. मंगेश उर्फ सोन्या विजय चव्हाण (वय २६ वर्षे, रा. नानापेठ, पुणे)
उघडकीस आलेले गुन्हे व कबुली
दोघांना चौकशीसाठी युनिट-१ गुन्हे शाखा कार्यालयात आणून पुणे शहर व अन्य ठिकाणी घडलेल्या घरफोडींच्या अनुषंगाने तपास करण्यात आला. त्यावेळी त्यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन (पिंपरी-चिंचवड) हद्दीत दुकानांचे शटर उचकटून दुकाने फोडल्याचे सांगितले. अधिक माहिती घेतल्यानंतर खालील गुन्ह्यांची नोंद असल्याचे स्पष्ट झाले:
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन (पिंपरी-चिंचवड): गु.रजि. नं. ५०४/२०२६, बीएनएस कलम ३०५, ३३४(५) अन्वये गुन्हा दाखल.
लोणावळा शहर पोलीस स्टेशन: गु.रजि. नं. २६१/२०२६, बीएनएस कलम ३०५(अ), ३३१(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल; ०५ दुकाने फोडल्याबाबत गुन्हा दाखल.
सासवड पोलीस स्टेशन: गु.रजि. नं. ५५८/२०२६, बीएनएस कलम ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल; या ठिकाणी ०४ दुकाने फोडल्याचे त्यांनी कबूल केले.
पुढील तपास व पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन (पिंपरी-चिंचवड) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांच्या मार्गदर्शनाखाली व पथकाने केली कामगिरी
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त गौहर हसन, आणि मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट ०१ गुन्हे शाखा पुणे शहर श्री. दिपक लगड यांच्या सूचनेप्रमाणे खालील पथकाने केली आहे:
सहा. पोलीस निरीक्षक धिरज राऊत
पोलीस अंमलदार समीर शेख
पोलीस अंमलदार किरण मोरे
पोलीस अंमलदार आशिष खरात
पोलीस अंमलदार संतोष नागरे
पोलीस अंमलदार सचिन कोळी
महिला पोलीस अंमलदार रेश्मा कंक

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























