Homeताज्या बातम्याशिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि कॉप २४ मार्शल्स च्या संयुक्त कामगिरीमुळे दहीहंडीच्या गर्दीत...

शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि कॉप २४ मार्शल्स च्या संयुक्त कामगिरीमुळे दहीहंडीच्या गर्दीत हरवलेले बालक ? तासाच्या आत पालकांच्या ताब्यात

शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि कॉप २४ मार्शल्स च्या संयुक्त कामगिरीमुळे दहीहंडीच्या गर्दीत हरवलेले बालक ? तासाच्या आत पालकांच्या ताब्यात

दिनांक. १६/०८/२०२५ रोजी दहिहंडी सनानिमित्ताने पुणे शहरात गर्दी होती. दरम्याण ज्ञानेश्वर पादुका चौक, एफ.सी. रोड, शिवाजीनगर, पुणे येथिल दहिहंडीच्या गर्दीत एक १३ वर्षीय बालक हरवल्याचा कॉल पुणे कंट्रोल डायल ११२ ला २२.५० वा च्या सुमारास प्राप्त झाला. सदरची माहीती विनाविलंब कंट्रोल वरुन कॉप २४ मार्शल्स शिवाजीनगर पोलीस ठाणे यांचेकडील एम.डी.टी डिव्हाईस वर कळविण्यात आली. मार्शल्स यांनी तात्काळ कॉलर यांना कॉल केला. त्यावेळी कॉलर यांनी ‘मी माझा मुलगा (बदललेले नाव) वय १३ वर्षे, याला सोबत घेवुन दहिहंडी चा कार्यक्रम पाहण्यास आलो असताना तो गर्दीत कुठेतरी हरवला आहे. त्याला या भागाबद्दल जास्त माहीती नाही. त्याने काळ्या रंगाचा टि-शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स पँट घातली असून तो चष्मा वापरतो.’ अशी माहीती दिली.

सदर कॉलचा आशय कॉप २४ मार्शल्स यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणेचे रात्रपाळी अधिकारी यांना कळविला. परिस्थितीचे गांभिर्य ओळखुन वरिष्ठांना माहीती देत रात्रपाळी अधिकारी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणेचे सर्व कॉप २४ मार्शल्स यांना नमुद वर्णनाच्या हरवलेल्या बालकाचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या व स्वतः देखील सदर बालकाच्या शोधा करीता रवाना झाले. शोध घेत असताना नमुद वर्णनाचा बालक मॉडर्न कॉलेज, भांबुर्डा मस्जिद परिसर, शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी एकटाच घाबरलेल्या अवस्थेत मिळून आला. सदर बालकाकडे रात्रपाळी अधिकारी व मार्शल्स यांनी सौम्यपणे चौकशी केली असता, त्याने फक्त त्याचे नाव (बदललेले नाव) सांगुन पत्ता माहीत नसल्याचे सांगितले व ‘काका मला मदत करा, मी हरवलो आहे’ असे म्हणाला.

डायल ११२ वर आलेल्या कॉलर यांच्या सांगण्याप्रमाणे बालक मिळाला असल्याने कॉलर यांना बालकासंबंधी माहीती देवुन तात्काळ मॉडर्न कॉलेज, भांबुर्डा मस्जिद परिसर, शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी बोलावून घेण्यात आले. बालकास पाहून कॉलर यांनी त्याला मिठीत घेत शिवाजीनगर पोलीस व कॉप २४ मार्शल्स यांचे आभार मानले. बालकास सुखरुपरित्या २३.३५ वा च्या सुमारास पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी शिवाजीनगर पो.स्टे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेश बोळकोटगी सोो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. धनंजय पिंगळे सोो यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक प्रमोद म. पाटील व कॉप २४ मार्शल चे पो.शि. ४२८ अक्षय डिडोरे, पो.शि. ८६४ सुरज पवार, पो.शि.८४४ ऋतिक वाघ व पो.शि.८५३ राजेंद्र येसनसुरे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

‘सिया गोयलची विग टिप्पणी, जबरदस्ती लग्न, गुप्त संबंध’: केतन अग्रवाल खून प्रकरणात ट्विस्टनंतर ट्विस्ट....

पोलिसांनी केतन अग्रवालची मंगेतर, सिया गोयल (20) आणि तिचा कथित साथीदार, चेतन चौधरी (22) यांना अटक केली आहे, त्यांच्यावर 18 जून रोजी 25...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद; ६ गुन्हे उघडकीस, ४...

​पुणे, दिनांक २७ जून २०२६: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने वाघोली परिसरात धडक कारवाई करत मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका सक्रिय...

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

error: Content is protected !!