सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी गळफाळ घेत आयुष्य संपवलं. पण आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या तळहातावर काही जणांवर गंभीर आरोप केले होते.ज्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
डॉ. मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची थेट नावे लिहित गंभीर खुलासे केले. डॉ. मुंडे यांनी पीएसआय बदने याने चार वेळा लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिस दलात आणि आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणात प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली असून, त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे, आत्महत्येनंतर फरार झालेल्या पीएसआय गोपाळ बदनेलाही पोलिसांनी अखेर अटक केली आहे. त्यानंतर आज सकाळी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यालादेखील अटक करण्यात आली. गोपाळ बदने याने स्वत:हून पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
पोलिसांना सरेंडर झाल्यानंतर गोपळ बदने म्हणाला, मी प्रमाणिक आहे आणि माझा पोलिस प्रशासनावर आणि न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालय जो निर्णय देईल त्यावर माझा विश्वास आहे. दरम्यान, महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने दोघेही फरार होते. पण पोलिसांनी शनिवारी (25 ऑक्टोबर) पुण्यातून प्रशांत बनकर याला अटक केली. पण गोपाळ बदने पोलिसांच्या फसवून सतत ठिकाणे बदल होता. फलटण पोलिसांनी दोन पथके त्याच्या शोधासाठी रवाना केली होती. पोलिसांनी त्याचे शेवटचे लोकेशन देखील ट्रेस केले होते. पण शनिवारी रात्री तो स्व:त फलटण पोलिस ठाण्यात सरेंडर झाला.
संपूर्ण प्रकरण काय?
महिला डॉक्टर सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होती. तिच्या तळहातावर लिहिलेल्या चिठ्ठीत तिने म्हटले आहे की, उपनिरीक्षक गोपाळ बदाणे यांनी तिच्यावर चार वेळा बलात्कार केला आणि पाच महिन्यांहून अधिक काळ तिला मानसिक आणि शारीरिक छळ केला. मूळ बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेली ही डॉक्टर २३ महिन्यांपासून रुग्णालयात सेवा देत होती. ग्रामीण सेवेसाठीचा जामीन पूर्ण होण्यास फक्त एक महिना बाकी असताना तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
तिने सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे?
तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने लिहिले आहे की, आरोपींसाठी बनावट फिटनेस प्रमाणपत्रे देण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी तिच्यावर दबाव आणला. कधीकधी आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठीही आणले जात नव्हते. तिने नकार दिल्यावर, उपनिरीक्षक गोपाळ बदाणे आणि इतरांनी तिला त्रास दिला. तिने चिठ्ठीत म्हटले आहे की, तिच्या मृत्यूचे कारण तिच्यावर बलात्कार करणारे उपनिरीक्षक गोपाळ बदाणे आणि चार महिने मानसिक आणि शारीरिक छळ करणारे प्रशांत बनकर आहेत. गोपाळ बदाणे हा एक पोलीस अधिकारी आहे, तर प्रशांत बनकर हा महिला डॉक्टर राहत असलेल्या घराच्या मालकाचा मुलगा आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























