सिंहगड स्कूल च्या आमरण उपोषणकर्त्यांना शिवसेनेचा पाठिंबा…
पुणे:- आर एम डी सिंहगड स्कूल च्या कर्मचाऱ्यांच्या आमरण उपोषण प्रकरणी शिवसेना पुणे शहराच्या वतीने दखल घेऊन उपोषण स्थळी जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तसेच त्यांच्या आंदोलनास शिवसेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला यावेळी आंदोलन कर्त्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांचे पत्र शिवसेना शिष्टमंडळास देऊन समस्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले सदर विषयात आम्ही सिंहगड इंस्टिट्यूट च्या प्रमुखांची आणि कामगार आयुक्तांची भेट घेणार आहे आणि सविस्तर चर्चा करणार आहे.
यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक वसंत मोरे, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, आबा निकम, सचिन पासलकर, मयूर वांजळे, अमर मारटकर, नितीन जगताप, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, गणेश काकडे, रूपेश थोपटे, सौरभ मोकाशी, सौरभ बिराजदार, उपस्थित होते.

सूचना / Disclaimer:
या पोर्टलवरील सर्व बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि मजकूर हे केवळ माहिती व जनहितासाठी प्रसारित केले जातात. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे किंवा अफवा पसरवणे हा नाही. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी आम्ही ती सत्य व खात्रीशीर असल्याची पुष्टी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.