Homeताज्या बातम्याहवेली तालुक्याला नवे नेतृत्व: अर्चना निकम तहसीलदार पदावर — अनुभवी, काटेकोर आणि...

हवेली तालुक्याला नवे नेतृत्व: अर्चना निकम तहसीलदार पदावर — अनुभवी, काटेकोर आणि पारदर्शक प्रशासनाची अपेक्षा

हवेली तालुक्याला नवे नेतृत्व: अर्चना निकम तहसीलदार पदावर — अनुभवी, काटेकोर आणि पारदर्शक प्रशासनाची अपेक्षा

हवेली तालुका (पुणे):
जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिष्ठा असलेल्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या हवेली तालुक्याच्या तहसीलदारपदी अर्चना निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव मनिषा जायभाये यांनी यासंदर्भातील नियुक्ती आदेश जारी केले आहेत. विद्यमान तहसीलदार किरण सुरवसे यांची पदोन्नती होऊन सोलापूर येथे बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते.

प्रशासनातील घडवलेली काटेकोर ओळख

अर्चना निकम या यापूर्वी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत कार्यरत होत्या. त्याआधी पिंपरी–चिंचवड येथील अप्पर तहसीलदार कार्यालयात त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. मजबूत प्रशासनिक कौशल्य, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि तडफदार निर्णयक्षमतेसाठी त्यांची ओळख राज्यभर आहे.

हवेली – सर्वाधिक ‘संवेदनशील आणि मलाईदार’ तालुका

हवेली तालुका हा महसूल विभागातील सर्वात महत्त्वाचा, प्रतिष्ठित, तसेच आव्हानात्मक तालुका समजला जातो.

मोठ्या प्रमाणात जमीन व्यवहार

लँड लिटिगेशन

वादग्रस्त व्यवहारांमुळे राज्यभर चर्चेत राहिलेले घोटाळे

दबावाचे राजकारण

यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही नजरा सदैव हवेली तालुक्यातील महसूल कामकाजावर असतात. या पार्श्वभूमीवर नव्या तहसीलदारांकडे काटेकोर, पारदर्शक आणि दक्ष प्रशासनाची मोठी जबाबदारी आहे.

प्रशासकीय आणि सार्वजनिक वर्तुळातून स्वागत

निकम यांच्या नियुक्तीनंतर हवेली तालुक्यातील नागरिक, स्थानिक जनता, तसेच प्रशासकीय अधिकारी–कर्मचारी यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले आहे. तालुक्यातील महसूल कामकाजात शिस्त, पारदर्शकता, गती आणि कायद्याचे अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल, अशी व्यापक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज तर्फे नवीन तहसीलदार अर्चना निकम यांचे हार्दिक अभिनंदन

हवेली तालुक्यासारख्या कठीण आणि जबाबदारीच्या पदावर नियुक्त झालेल्या अर्चना निकम यांना क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.
तालुक्यात प्रभावी, पारदर्शक आणि मजबूत प्रशासनातून नागरिकांचा विश्वास वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

हवेली तालुक्यात महसूल विभागाचे नव्याने होणारे कामकाज आणि अर्चना निकम यांच्या पुढील निर्णयांवर सर्वांचेच लक्ष राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन...

​पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण तसेच सासवड व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने शिरूर...

पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद: व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे बदनामी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर...

सविस्तर वृत्त (प्रथम खबर अहवालानुसार) ​पुणे शहरातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची आणि तिच्या कुटुंबाची लैंगिक व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी तसेच...

error: Content is protected !!