Homeताज्या बातम्याॲल्ब्युरेल’ बनावट औषध विक्रीचा भंडाफोड; पाच ठोक विक्रेत्यांवर गुन्हा

ॲल्ब्युरेल’ बनावट औषध विक्रीचा भंडाफोड; पाच ठोक विक्रेत्यांवर गुन्हा

पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; १ मार्च २०२६ : पुण्यात ॲल्ब्युरेल नावाच्या बनावट औषधाची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पाच वितरक-पुरवठादारांवर गुन्हा दाखल केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासात ॲल्ब्युरेल नावाचे बनावट औषध बाजारात विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी पुणे, मुंबई, नागपूर आणि रायगड येथील पाच ठोक विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या रॅकेटचा भंडाफोड औषध निरीक्षक श्रुतिका जाधव यांच्या फिर्यादीवरून झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्याच्या पुणे विभागात कार्यरत असलेल्या औषध निरीक्षक श्रुतिका जाधव यांनी २८ जुलै २०२५ रोजी सदाशिव पेठ येथील मे. मैत्री फार्मास्युटिकल्स येथे तपासणी केली. तेथून ॲल्ब्युरेल व रिच्युएक्सरेल या औषधांचे नमुने घेऊन ते शासकीय विश्लेषक, मुंबई यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

शासकीय विश्लेषकांच्या अहवालानुसार ॲल्ब्युरेल हे औषध चाचणीमध्ये अपयशी ठरले असून, ते औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० च्या कलम १७ (ब) अन्वये बनावट घोषित करण्यात आले आहे. तपासादरम्यान या बनावट औषधाची खरेदी-विक्री साखळीत मे. मैत्री फार्मास्युटिकल्स (सदाशिव पेठ, पुणे), मे. श्री साई लॉजिस्टिक (नागपूर), एम/एस नेक्सस लाईफकेअर प्रा. लि. (दादर (पूर्व), मुंबई), एन आर एक्स डिस्ट्रिब्युटर्स एलएलपी ( सायन, मुंबई), एम/एस आरआरटी फार्मा (कामोठे, रायगड) या सर्वांनी संगनमत करून बनावट औषधांची खरेदी-विक्री केल्याचा आरोप आहे. बनावट औषधावर उत्पादक म्हणून नमूद असलेल्या रिलायन्स लाईफ सायन्स प्रा. लि. (नाशिक) यांनी लेखी पत्राद्वारे संबंधित बॅचचे उत्पादन त्यांनी केले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

MSRTC ची ई-बस फ्लीट विस्ताराची योजना आहे, परंतु चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर मागे आहे. पुणे बातम्या

पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) आपल्या ई-बस ताफ्याचा मोठा विस्तार करण्याची योजना करत असेल, परंतु सध्याची चार्जिंग पायाभूत सुविधा अपुरी आहे.राज्य परिवहन...

PCMC ने चिखली-कुदळवाडी परिसरात रात्रभर मोहिमेत 4 अनधिकृत धार्मिक वास्तू पाडल्या. पुणे बातम्या

पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) चिखली-कुदळवाडी परिसरात सोमवारी रात्री कडेकोट बंदोबस्त आणि तणावपूर्ण तणावाच्या पार्श्वभूमीवर चार अनधिकृत धार्मिक वास्तू हटवल्या.परिसरातील ३१ अनधिकृत धार्मिक वास्तूंना...

आंबेगाव येथील लॉजिंगवर गुन्हे शाखेचा छापा; ४ महिलांची सुटका, एका एजंटला अटक

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष (गुन्हे शाखा) यांनी पुणे-सातारा रोडवरील आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका लॉजिंगवर धाड टाकून देहविक्रय...

PCMC ने 24 गृहनिर्माण सोसायट्यांना गैर-कार्यरत STPs वर पाणीपुरवठा खंडित केला, इतर 16 नाल्यांमध्ये...

पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) या महिन्यात 24 गृहनिर्माण सोसायट्यांना अनेक नोटिसा देऊनही त्यांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) चालविण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांचा पाणीपुरवठा खंडित...

ट्रिब्युनलने 2016 मध्ये बाईक-कार अपघातात 77L नुकसान भरपाई दिली ज्याने जोडप्याचा मृत्यू झाला |...

पुणे: शहरातील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (MACT) 2016 च्या एका प्रकरणात गुरूवारी 77 लाख रुपयांहून अधिक नुकसान भरपाई स्वतंत्रपणे सुनावली आहे ज्यात 19 ऑगस्ट...

error: Content is protected !!