Homeताज्या बातम्यादेशाचे पंतप्रधान कोण? बुधवार पेठेत मध्यरात्री अचानक छापा, पोलिसांचे 2 प्रश्न अन्...

देशाचे पंतप्रधान कोण? बुधवार पेठेत मध्यरात्री अचानक छापा, पोलिसांचे 2 प्रश्न अन् अशी झाली बांगलादेशी महिलांची पोलखोल!

पुण्यात घुसखोर बांगलादेशी नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र आहे. पुणे येथील बुधवार पेठ या रेड लाईट एरियामध्ये फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई करत 5 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलीये.विशेष कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली असून, या महिला बेकायदेशीरपणे भारतात राहून देह व्यापार करत असल्याचं तपासात उघड झालं आहे. या महिलांकडे भारतात राहण्यासाठी कोणतेही वैध डॉक्युमेंट उपलब्ध नव्हते. तसेच पोलिसांनी दोन प्रश्न विचारले अन् बांगलादेशी महिलांची पोलखोल झाली.
पोलिसांनी दोन प्रश्न विचारले अन्…

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान काही ग्राहकांनी दिलेल्या माहितीमुळे पोलिसांचा संशय बळावला. या महिलांच्या बोलण्याची पद्धत आणि शब्द बांगलादेशी लोकांशी साधर्म्य दर्शवणारे होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली असता, या महिलांनी सुरुवातीला आपण पश्चिम बंगालच्या असल्याचा दावा केला होता. पण पोलिसांनी दोन प्रश्न विचारले अन् महिला बांगलादेशी असल्याचं सिद्ध झालं.
प्रथम राष्ट्रगीत म्हणायला लावलं

पोलिसांनी महिलांना प्रथम राष्ट्रगीत म्हणायला लावलं. त्यानंतर त्यांनी पंतप्रधानांचं नाव विचारलं, याचं उत्तर महिलांकडं नव्हतं. त्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालमधील आसपासच्या गावाची नावं विचारली, ती देखील त्यांना सांगता आली नाही. पाचही महिला समाधानकारक उत्तरे देऊ शकल्या नाहीत. यावरून त्या बांगलादेशी नागरिक असल्याचं स्पष्ट झालं अन् पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. फरासखाना पोलिसांनी रविवारी रात्री 1 ते सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बुधवार पेठ परिसरातील माचिस बिल्डिंग आणि इतर भागात सघन शोधमोहीम राबवली होती.
11 महिन्यांत तब्बल 95 बांगलादेशी

या महिलांनी सीमा ओलांडून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता आणि त्या स्वतःच्या इच्छेने या व्यवसायात सहभागी होत्या, असं डीसीपी ऋषिकेश रावले यांनी सांगितलं. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कारवाईत गेल्या 11 महिन्यांत तब्बल 95 बांगलादेशी नागरिकांना पुणे शहरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पुण्यातून बांगलादेशी कधी हद्दपार होणार? असा सवाल विचारला जातोय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​कर्बलाच्या शहीदांच्या स्मरणार्थ एकतेची मिसाल: मोहरमच्या रात्री पुण्यात सरबतासाठी मोफत साखर वाटप

​पुणे, दि. २५ जून २०२६: मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना 'मोहरम'च्या नवव्या दिवशी, म्हणजेच 'कत्तलची रात्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रात्री, 'पंजेतन पवित्र संघटना, महाराष्ट्र राज्य' यांच्या...

मुंबई लोकल हत्या: ‘सोशल मीडिया ट्रायल’मुळे आमच्या आयुष्यावर, नोकऱ्यांवर परिणाम; असे आरोपीच्या कुटुंबीयांचे म्हणणे...

सोशल मीडिया ट्रायलमुळे आमचे जीवन आणि नोकऱ्यांवर परिणाम होत आहे, असे मुंबई लोकल ट्रेनवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचे नातेवाईक म्हणतात मुंबई: मुंबई लोकल ट्रेनमध्ये...

सोनम रघुवंशी तुरुंगातून बाहेर आल्याने सिया गोयलने केतन अग्रवालची हत्या केली: राजाची आई. पुणे...

पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येवर इंदूरचा खून झालेला व्यापारी राजा रघुवंशी यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, सोनम रघुवंशी...

मुंबई आणि पुण्यात पाणी साचल्याने सुप्रिया यांनी भाजपवर निशाणा साधला. पुणे बातम्या

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ताथवडे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक विस्कळीत...

‘तिने प्लॅन केला, नाही त्याने माझ्यावर जबरदस्ती केली’: पुणे रिअल्टरच्या खून प्रकरणात ट्विस्ट आणि...

गहुंजे रियाल्टर केतन अग्रवाल यांच्या खून प्रकरणाला नवे वळण लागले आहे - दोन आरोपी - त्याची मंगेतर सिया गोयल (सी) आणि तिचा 'पार्टनर'...

error: Content is protected !!