Homeताज्या बातम्या✳️ राहुरीत दिव्यांग संघटनांच्या सहकार्याने बेघर अंध मनोरुग्ण महिलेला माऊली प्रतिष्ठानच्या स्वाधीन...

✳️ राहुरीत दिव्यांग संघटनांच्या सहकार्याने बेघर अंध मनोरुग्ण महिलेला माऊली प्रतिष्ठानच्या स्वाधीन ✳️

📍 राहुरी | दिनांक: 5 ऑगस्ट 2025

राहुरी शहरातील शनी मंदिर परिसरात भीक मागत असलेल्या एका अल्पदृष्टी असलेल्या बेघर व मनोरुग्ण महिलेची मानवी दृष्टिकोनातून सुटका करण्यात आली आहे. प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही महिला माऊली प्रतिष्ठान देहरे येथे सुखरूपपणे हलविण्यात आली.

या महिलेचे नाव छाया खंडू माळी (वय ५०, पाचेगाव) असे असून, ती गेल्या काही दिवसांपासून शनी चौकात रस्त्याच्या कडेला राहात होती. तिची आरोग्याची व मानसिक स्थिती अत्यंत खराब होती. टाकळीमिया शाखेचे उपाध्यक्ष विष्णू ठोसर यांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर घाडगे यांच्याशी संपर्क साधला.

3 ऑगस्ट रोजी मधुकर घाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी — अनिल तनपुरे, योगेश लबडे, सलीम शेख, जालिंदर भोसले, विजय म्हसे, गोरख देवरे, बाळासाहेब गांडाळ, संदीप बोरसे, सुखदेव कीर्तने — या महिलेला चौकशी करून प्रथम तांदुळवाडी येथील कृपा वृद्धाश्रम येथे हलवले. मात्र, वृद्धाश्रमाच्या नियमांनुसार ती महिला तिथे ठेवता न आल्याने, पुढे माऊली प्रतिष्ठान देहरे येथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रक्रियेसाठी राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच नायब तहसीलदार सौ. संध्या दळवी मॅडम यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या 108 अ‍ॅम्बुलन्स सेवा व डॉ. राजेंद्र धामणे (माऊली प्रतिष्ठान) यांच्याशी समन्वय साधून अखेर 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता माऊली प्रतिष्ठानच्या गाडीतून या महिलेला हलवण्यात आले.

डॉ. धामणे यांच्याकडे महिलेच्या डोळ्याच्या ऑपरेशनसह आवश्यक औषधोपचारांची विनंती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

या मानवीतेच्या कार्याबद्दल पोलीस निरीक्षक ठेंगे साहेब व तहसीलदार दळवी मॅडम यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

🖊️ सहसंपादक: शिवाजी दवणे
क्राईम महाराष्ट्र न्यूज | संपर्क: 9730170965

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाहन तोडफोडीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट २ कडून अटक

पुणे: पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या कडक सूचनांच्या पार्श्वभूमीवर, पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ ने एक महत्त्वाची कामगिरी...

राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार २०२६ जाहीर! ​ह.भ.प. संतदास उपाख्य श्री. पुरुषोत्तम...

आळंदी देवाची: अभंगकार ह.भ.प. संतदास उपाख्य श्री. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांच्या साहित्यातील बहुमोल योगदानाची दखल घेऊन त्यांना "राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार २०२६"...

चंदुकाका सराफ ज्वेलर्सची १४ लाख ७८ हजार ७६० रुपयांची फसवणूक करणारा आरोपी जेरबंद

पुणे: प्रगती बिल्डकॉन कंपनीचा मालक असल्याचे भासवून चंदुकाका सराफ, चंदननगर यांची फसवणूक करून १४,७८,७६०/- रुपये किमतीची १०० ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्कीटे घेऊन फरार झालेल्या मुख्य...

डिजीटल अरेस्टचा धक्कादायक प्रकार: पुण्यातील ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १० कोटी ७४ लाखांची फसवणूक;...

पुणे: डिजीटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा पुणे सायबर...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: ३ गावठी अग्निशस्त्र व १ जिवंत काडतूसह तीन आरोपी...

घटनेची पार्श्वभूमी व कारवाई ​दिनांक १०/०८/२०२६ रोजी आंबेगाव पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते, धनाजी धोत्रे, सचिन गाडे व सुभाष मोरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत...

error: Content is protected !!