Homeताज्या बातम्यामहात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी सहाय्यक कै. पांडुरंग तुकाराम कुसळकर यांचे हृदयविकाराच्या...

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी सहाय्यक कै. पांडुरंग तुकाराम कुसळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

राहुरी, जि. अहमदनगर – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कापूस सुधार प्रकल्पात कृषी सहाय्यक पदावर कार्यरत असलेले पांडुरंग तुकाराम कुसळकर (वय ५५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी कार्यालयीन कामकाजादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना राहुरी येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांना दुसरा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

कुसळकर यांनी कापूस सुधार प्रकल्पातील संशोधन, विकास आणि कर्मचारी हिताच्या उपक्रमांमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील १२/२४ प्रगत योजना कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान होते. प्रेमळ स्वभाव आणि प्रामाणिक कार्यशैलीमुळे ते सर्वांच्या मनात आदराचे स्थान मिळवून गेले होते.

त्यांच्या अकस्मात निधनाने विद्यापीठ परिसरात शोककळा पसरली असून, सर्व सहकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दि. ५ ऑगस्ट रोजी सोनई (ता. नेवासा) येथील मूळ गावी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिवार, सहकारी वर्ग व कृषी विद्यापीठ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सहसंपादक:
शिवाजी दवणे
क्राईम महाराष्ट्र न्यूज
📞 9730170965

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे....

हजारो झाडे आणि रोपे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो. पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे. पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात. पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

कॅब रद्द करणे आणि पुण्यातील रोजच्या प्रवासाच्या भाड्यावरून वाद | पुणे बातम्या

पुणे विमानतळावर कॅबच्या रांगा पुणे : संपूर्ण शहरातील प्रवासी कॅब रद्द करणे, भाडे विवाद आणि ड्रायव्हर्ससह वादविवाद वाढवत आहेत कारण ट्रिप ॲप-आधारित भाडे...

भीमाशंकर मंदिरात मोफत दर्शन सुविधा पुन्हा सुरू, सुरू असलेल्या कामांमध्ये गर्दीमुळे गर्दी व्यवस्थापनाची चिंता...

आठवड्याच्या शेवटी, धार्मिक कार्यक्रमांदरम्यान आणि संपूर्ण पावसाळ्यात गर्दी आणखी वाढेल अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. पुणे : विख्यात ज्योतिर्लिंग देवस्थान असलेल्या भीमाशंकर मंदिरात जवळपास...

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशिवाय सेनेचा कोणताही गट अस्तित्वात नाही : शहा | पुणे बातम्या

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (अत्यंत डावीकडे) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (अत्यंत उजवीकडे) यांच्या उपस्थितीत शनिवारी कोल्हापुरात 'धन्यवाद सभे' दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

error: Content is protected !!