Homeताज्या बातम्यापुणे मनपाच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यावर लाचखोरीचे गंभीर आरोप; चौकशीची मागणी

पुणे मनपाच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यावर लाचखोरीचे गंभीर आरोप; चौकशीची मागणी

पुणे मनपाच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यावर लाचखोरीचे गंभीर आरोप; चौकशीची मागणी

पुणे : शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या भिंडे पुलाखालील अनधिकृत व्यवसायांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आणि संबंधितांकडून लाच घेतल्याचा गंभीर आरोप पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील एका अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जागृत नागरिक विकास मंचचे अध्यक्ष शंकर ठाकूर यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार सादर केली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, भिंडे पुलाखालील परिसरात अनधिकृत व्यवसाय सुरू असून त्यामुळे परिसरात वारंवार वाद व भांडणे होत असल्याचे सांगितले जाते. या प्रकारामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. तसेच पुणे महानगरपालिका आयुक्तांनीही संबंधित विभागाला कारवाईचे निर्देश दिल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ४ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १.२५ वाजण्याच्या सुमारास निशीगंधा हॉटेलसमोर चहाच्या टपरीजवळ संबंधित अधिकाऱ्याने एका व्यक्तीकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे छायाचित्र देखील पुरावा म्हणून सादर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे पुणे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जागृत नागरिक विकास मंचाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नसून चौकशीअंतीच या प्रकरणातील सत्य समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंचर येथील ऐतिहासिक पांडवकालीन बारव आणि दर्गा परिसरावरील वादावर ‘मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन’ची भूमिका...

मंचर येथील ऐतिहासिक पांडवकालीन बारव आणि दर्गा परिसरावरील वादावर ‘मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन’ची भूमिका इतिहासाचे जतन करताना सामाजिक सलोखा अबाधित ठेवणे आवश्यक डॉ. फरहा...

घोषणा म्हणजे डोळे वटारणे : शेट्टी | पुणे बातम्या

नाशिक : अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव अजित नवले यांनी या घोषणेचे स्वागत केले मात्र लागू केलेल्या अटी समजून घेणे आवश्यक...

वाहतूक व्यवस्था शाश्वत करण्यावर भर द्या, भारताची ऊर्जा सुरक्षा वाढवा: गडकरी. पुणे बातम्या

पुणे: विद्यमान भू-राजकीय परिस्थिती आणि पश्चिम आशियातील अशांतता यामुळे ऊर्जा सुरक्षेच्या अनिश्चिततेच्या वातावरणात भारतीय वाहतूक व्यवस्था शाश्वत बनविण्याचे केंद्र सरकारचे ध्येय आहे, असे केंद्रीय...

सर्वसमावेशक भटक्या कुत्र्यांच्या धोरणासाठी महापालिकेचे महापौर प्राणीप्रेमींची बैठक घेणार आहेत. पुणे बातम्या

पुणे : शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आखण्यासाठी महापालिका लवकरच प्राणीप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक घेणार असल्याचे पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे...

GRAS पोर्टलच्या त्रुटीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मालमत्ता नोंदणीला फटका; दुपारनंतर सेवा पूर्ववत | पुणे बातम्या

पुणे: मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरण्यासाठी अनिवार्य व्यासपीठ असलेल्या गव्हर्नमेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टीम (GRAS) पोर्टलला - मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रातील मालमत्तेची...

error: Content is protected !!