Homeताज्या बातम्याखडकवासला धरण दुर्घटनेत ३ युवकांचा बळी – जबाबदारांवर कारवाईच्या मागणीसाठी उपोषण” ...

खडकवासला धरण दुर्घटनेत ३ युवकांचा बळी – जबाबदारांवर कारवाईच्या मागणीसाठी उपोषण” रिपब्लिकन बहुजन आघाडी आक्रमक उपोषणकर्ते : माहिती अधिकार कार्यकर्ता किशोर मनोहर कांबळे

खडकवासला धरण दुर्घटनेत ३ युवकांचा बळी – जबाबदारांवर कारवाईच्या मागणीसाठी उपोषण”
रिपब्लिकन बहुजन आघाडी आक्रमक
उपोषणकर्ते : माहिती अधिकार कार्यकर्ता किशोर मनोहर कांबळे

पुणे :
खडकवासला धरणातून २५ जुलै २०२४ रोजी अंदाधुंद पद्धतीने पाणी सोडल्यामुळे तिन्ही होतकरू तरुणांचा बळी गेला, तसेच एकता नगरी, हिंगणे खुर्द व निंबज नगरसह पुणेकरांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले, त्यावेळी एकता नगरी ला भेट देऊन स्वतः पुण्याचे खासदार मा मुरलीधर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याची माहिती दिली होती.
सदर विषयात गेले अनेक महिने सर्व पुरावे तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत तरीही जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे रिपब्लिकन बहुजन आघाडीच्या वतीने किशोर कांबळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

गुरुवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२५ पासून सिंचन भवन, मंगळवार पेठ, पुणे येथे माहिती अधिकार कार्यकर्ता किशोर मनोहर कांबळे यांनी अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले आहे.

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या :

१) मानवी जीवितहानी –
कार्यकारी अभियंता श्रीमती श्वेता योगेंद्र कुऱ्हाडे व कार्यकारी संचालक पाटबंधारे विभाग श्री हनुमंत गुणाले यांनी निष्काळजीपणाने खडकवासला धरणाचे पाणी सोडले, त्यामुळे ३ युवकांचा मृत्यू झाला. त्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा.

२) आर्थिक नुकसान भरपाई –
एकता नगरी, हिंगणे खुर्द, निंबज नगर व सिंहगड रोड परिसरातील तसेच सदर पुरामुळे झालेल्या पुणेकरांचे, नागरिकांचे झालेले आर्थिक नुकसान जबाबदार अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावे.

३) सदर प्रकरण बाहेर आल्याने कार्यकारी अभियंता श्रीमती श्वेता कुऱ्हाडे आणि कार्यकारी संचालक पाटबंधारे हनुमंत गुणाले यांनी दलित आंबेडकरी व भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ता किशोर कांबळे यांच्यावर सूडबुद्धीने समर्थ पोलिस ठाण्यात व जिल्हाधिकारी कार्यालयात खोटी तक्रार करण्यात आली. त्यामुळे SC/ST Atrocity Act 1989 अन्वये गुन्हा दाखल व्हावा.

४) हडपसर भूखंड घोटाळा – खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अखित्यारीत येणारे हडपसर मुठा उजवा कालवा, माईल क्रमांक 15/7, सर्वे नंबर 224 व 226 या जलसंपदा खात्याच्या भूखंडाचा खोटे कागदपत्र करून खाजगी विकसकाला लाभ देण्यात आला. त्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.

५) महिला सन्मानाचा प्रश्न – कार्यकारी अभियंता खडकवासला श्रीमती श्वेता कुऱ्हाडे यांनी कार्यकर्त्यांवर व शासकीय अधिकाऱ्यांवर खोट्या विनयभंगाच्या तक्रारी करून समस्त महिलांचा अपमान केला आहे. महिला आयोगाने तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करावी.

उपोषणकर्त्यांचा सवाल :

“निष्पाप तरुणांचे प्राण गेले, नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले, तक्रारींचा ढीग असूनही जबाबदार अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालत आहे?” असा सवाल उपोषणकर्ते किशोर कांबळे यांनी उपस्थित केला.
यावेळी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी अँड आकाश साबळे, सागर ढावरे, तुषार पायगुडे, संजय साळवी , तानाजी लोहकरे, अमित काळे, इतर सहकारी उपस्थित होते.
मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे असे आंदोलनकर्तेंकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीएम रिलीफ फंडासाठीचा अर्ज लवकरच 8 तासांत मंजूर केला जाईल. पुणे बातम्या

पुणे: अर्ज सादर केल्यापासून आठ तासांच्या आत अर्ज मंजूर केले जातील आणि ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी लवकरच नवीन ऑनलाइन प्रणाली सुरू केली जाईल या...

पुण्यातील RMCs ऑपरेशनला विराम देतात, नियमांची स्पष्टता, एकसमान अंमलबजावणी शोधतात. पुणे बातम्या

पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रिट ऑपरेटर्सनी संबंधित सर्व प्राधिकरणांनी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे तयार करेपर्यंत उत्पादन थांबवले आहे, तरीही नागरी संस्थेने वनस्पतींवर कारवाई...

PCMC कर्मचाऱ्यांसाठी दोन अतिरिक्त वेतनवाढीसाठी मराठीत एमए, कायदा समितीने प्रस्ताव मंजूर केला. पुणे बातम्या

पुणे: प्रशासनात प्रादेशिक भाषेचा वापर अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) विधी समितीने मराठीत पदव्युत्तर (एमए) पदवी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना दोन...

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे. पुणे...

पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

हिंजवडीतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची चिंता भेडसावत असल्याने ढिगाऱ्यामुळे मुळा प्रवाहात अडथळे येत आहेत. पुणे...

पुणे: पिण्याच्या पाण्यासाठी मुळा नदीवर अवलंबून असलेल्या हिंजवडीवासीयांनी हिंजवडी-वाकड पुलाजवळ मोठ्या प्रमाणात बांधकामाचा ढिगारा टाकल्याने आणि अडथळ्यांमुळे चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी दावा केला...

error: Content is protected !!