Homeताज्या बातम्याखराडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई : ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण प्रकरणातील ५ आरोपींना...

खराडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई : ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण प्रकरणातील ५ आरोपींना अटक, ठेकेदाराची सुखरूप सुटका

खराडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई : ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण प्रकरणातील ५ आरोपींना अटक, ठेकेदाराची सुखरूप सुटका
पुणे : खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून अपहरण झालेल्या व्यावसायिकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
दि. १४ एप्रिल २०२६ रोजी इराणी कॅफे हॉटेलसमोर, खराडी येथे खडी क्रशर प्लांटसाठी जागा दाखविण्याच्या बहाण्याने एका रेल्वे मेट्रो ठेकेदाराचे मोटारीतून अपहरण करण्यात आले. याप्रकरणी तक्रारदाराच्या फिर्यादीवरून खराडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्र. १२०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०४(२), ३४२, ३०८(२), ३०८(३), ३०८(४), ३८९(२), ३९०, ३९९(२), ३९५(२), ३५९(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या. मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-४) श्री. सोमय मुंडे, तसेच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी पोलीस ठाणे श्री. संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे मार्गदर्शन केले.
तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे व पोलीस उपनिरीक्षक श्री. राहुल कोळपे तसेच इतर पोलीस अंमलदारांचा समावेश होता. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला.
तपासात मुख्य आरोपी सागर दत्तात्रय झुंजरे (रा. लोणीकंद) याने तक्रारदाराला पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर वाहनात जबरदस्तीने बसवून अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर इतर साथीदारांसह तक्रारदाराला लोणीकंद, शिक्रापूर, सणसवाडी, रांजणगाव परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्याच्याकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.
पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे पेरणे फाटा परिसरात नाकाबंदी करून सापळा रचला आणि ५ आरोपींना ताब्यात घेत तक्रारदाराची सुटका केली.
अटक आरोपी :
१) सागर दत्तात्रय झुंजरे (वय ३९, रा. लोणीकंद)
२) विजय सुरेश वाळंज (वय ३८, रा. लोणीकंद)
३) राजू विजयकुमार सहाणे (वय ३२, रा. लोणीकंद)
४) रूपेश शिवाजी गावडे (वय ३८, रा. लोणीकंद)
५) प्रकाश बाळासाहेब उर्फ बाळू राऊत (वय ३४, रा. तुळापूर)
आरोपींकडून २ फॉर्च्युनर, १ स्कॉर्पिओ व १ मोबाईल असा एकूण सुमारे ४९.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे करीत आहेत.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोजकुमार पाटील, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, मा. पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-४) श्री. सोमय मुंडे, तसेच मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (खराडी विभाग) श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक श्री. राहुल कोळपे, तसेच पोलीस अंमलदार श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, मनोज खरपडे, साहेबराव गंडाळे, सरज जाधव, अशोक केदार, श्रीकांत कोद्रे, विलास केदारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या धडाकेबाज कारवाईमुळे खराडी परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत झाली असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धर्मादाय रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट? रुग्ण हक्क संघर्ष समितीची तक्रार

पुणे | प्रतिनिधी पुणे शहरातील काही धर्मादाय रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, याबाबत रुग्ण हक्क संघर्ष समितीने थेट धर्मादाय...

PCMC कायदा समितीने निविदा अटींवर नियंत्रण मिळवले, वादाला तोंड फुटले Pune News

पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) विधी समितीने सर्व नागरी निविदांसाठी अटी व शर्ती निश्चित करण्याचे पूर्ण अधिकार मिळवून देणारा प्रस्ताव मंजूर केला आहे. या...

2022 मध्ये मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नाईला 5 वर्षांचा तुरुंगवास. Pune News

पुणे: 7 नोव्हेंबर 2022 रोजी विमंतल पोलीस हद्दीतील दुकानातील खोलीत सात वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश (पोक्सो कायदा) एसएस...

कॉसमॉस बँकेच्या माजी अध्यक्षांचे निधन | पुणे बातम्या

पुणे : कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 1978 मध्ये बँकेच्या...

भोरमध्ये अन्न प्रक्रिया केंद्र, व्यवहार्यता तपासण्यासाठी सरकारची मुख्यमंत्र्यांची नजर. पुणे बातम्या

पुणे : भोर तालुक्याला अन्न प्रक्रिया विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) किंवा निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याच्या व्यवहार्यतेची सरकार तपासणी करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

error: Content is protected !!