Homeताज्या बातम्यागे डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढून लुटले; वारजे माळवाडी पोलिसांनी अर्ध्या तासात...

गे डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढून लुटले; वारजे माळवाडी पोलिसांनी अर्ध्या तासात आरोपींना ठोकल्या बेड्या

पुणे:
सोशल मीडिया आणि डेटिंग ॲपच्या माध्यमातून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच, पुणे शहरात एका तरुणाला ‘गे डेटिंग ॲण्ड चॅट’ ॲपच्या माध्यमातून बोलावून मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अत्यंत चपळाईने हालचाली करत अवघ्या अर्ध्या तासात आरोपींना जेरबंद केले आहे.
​नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी तरुणाला आरोपींनी ‘गे डेटिंग ॲण्ड चॅट’ या ॲपद्वारे चॅटिंग करून भेटायला बोलावले होते. तरुण भेटीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर चार अनोळखी इसमांनी त्याला घेरले आणि बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर, मोबाईलद्वारे जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करून घेतले आणि त्याच्या गळ्यातील चांदीची चैन हिसकावून पळ काढला. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे दिनांक ०८/०५/२०२६ रोजी गुन्हा र.नं. १५३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
​तपास आणि अटकेची कारवाई
​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी तात्काळ तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे यांना कारवाईचे आदेश दिले. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. पोलीस अंमलदार बालाजी काटे व महादेव शिंदे यांना बातमी मिळाली की, यातील एक आरोपी अतुलनगर चौकात थांबलेला आहे.
​पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एका आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव ओम गणेश वाघमारे (वय २० वर्षे, रा. चिंतामणी सोसायटीच्या मागे, वारजे माळवाडी) असे सांगितले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या एका अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
​या पथकाने केली कारवाई
​ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ३) संभाजी कदम, आणि मा. सहा. पोलीस आयुक्त (कोथरुड विभाग) सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.
​तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे, पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, तसेच पोलीस अंमलदार बालाजी काटे, शरद पोळ, निखील तांगडे, अमित जाधव, अमित शेलार, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे व महादेव शिंदे यांचा सहभाग होता. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक शंकर पाटील करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​कर्बलाच्या शहीदांच्या स्मरणार्थ एकतेची मिसाल: मोहरमच्या रात्री पुण्यात सरबतासाठी मोफत साखर वाटप

​पुणे, दि. २५ जून २०२६: मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना 'मोहरम'च्या नवव्या दिवशी, म्हणजेच 'कत्तलची रात्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रात्री, 'पंजेतन पवित्र संघटना, महाराष्ट्र राज्य' यांच्या...

मुंबई लोकल हत्या: ‘सोशल मीडिया ट्रायल’मुळे आमच्या आयुष्यावर, नोकऱ्यांवर परिणाम; असे आरोपीच्या कुटुंबीयांचे म्हणणे...

सोशल मीडिया ट्रायलमुळे आमचे जीवन आणि नोकऱ्यांवर परिणाम होत आहे, असे मुंबई लोकल ट्रेनवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचे नातेवाईक म्हणतात मुंबई: मुंबई लोकल ट्रेनमध्ये...

सोनम रघुवंशी तुरुंगातून बाहेर आल्याने सिया गोयलने केतन अग्रवालची हत्या केली: राजाची आई. पुणे...

पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येवर इंदूरचा खून झालेला व्यापारी राजा रघुवंशी यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, सोनम रघुवंशी...

मुंबई आणि पुण्यात पाणी साचल्याने सुप्रिया यांनी भाजपवर निशाणा साधला. पुणे बातम्या

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ताथवडे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक विस्कळीत...

‘तिने प्लॅन केला, नाही त्याने माझ्यावर जबरदस्ती केली’: पुणे रिअल्टरच्या खून प्रकरणात ट्विस्ट आणि...

गहुंजे रियाल्टर केतन अग्रवाल यांच्या खून प्रकरणाला नवे वळण लागले आहे - दोन आरोपी - त्याची मंगेतर सिया गोयल (सी) आणि तिचा 'पार्टनर'...

error: Content is protected !!