पुणे:
पुणे शहर पोलिसांच्या चंदननगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागात घरफोडीचे सत्र चालवून पोलिसांसमोर आव्हान उभे करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात चंदननगर पोलिसांच्या तपास पथकाला मोठे यश आले आहे. या अटकेमुळे परिसरातील तब्बल ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लागला सुगावा
चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खालील तीन घरफोडीचे गुन्हे दाखल होते:
१) गु.र.नं. ४७१/२०२५ – भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१ (३)
२) गु.र.नं. १६९/२०२६ – भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३२९ (४), ३३१ (१), ३३१ (३), ३३२ (क)
३) गु.र.नं. १७०/२०२६ – भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१ (१), ३३१ (३)
या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी चंदननगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळावरील तसेच आजूबाजूच्या चौक आणि रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची अत्यंत बारकाईने पाहणी केली. या तपासात तिन्ही गुन्ह्यांमधील आरोपी हा एकच असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अधिक तांत्रिक तपास केला असता, हा आरोपी रफिक हुसेन शेख (वय ३२ वर्षे, रा. चिंतामणीनगर, गल्ली नं. ०३, सय्यदनगर, हडपसर, पुणे) असल्याचे निष्पन्न झाले.
हडपसर परिसरातून आवळल्या आवळल्या मुसक्या
आरोपीची ओळख पटल्यानंतर चंदननगर पोलिसांच्या पथकाने त्याच्या राहत्या घरी तसेच हडपसर परिसरामध्ये कसून शोध घेतला. अखेर दिनांक १२/०५/२०२६ रोजी त्याला हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून तपास पथकाने ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी रफिक हुसेन शेख याने वरील तिन्ही घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला गु.र.नं. ४७१/२०२५ मध्ये अधिकृतपणे अटक करण्यात आली आहे. आरोपीने गुन्हे करताना वापरलेली दुचाकी गाडी देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. या दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विकास बाबर हे करत आहेत.
कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार
सदरची उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये:
श्री. मनोज पाटील (मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर)
श्री. सोमय मुंडे (मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०७, पुणे शहर)
श्रीमती नुतन पवार (मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, खराडी विभाग, पुणे शहर)
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निलेश बडाख यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे:
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे
सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बाबर
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे
पोलीस उप-निरीक्षक अमोल घोडके
पोलीस अंमलदार: मेमाणे, डांगे, मुलाणी, घुटे, कदम, पाटील, लहाणे आणि बेंद्रे यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























