Homeताज्या बातम्याछत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त पीएमपीएमएलकडून वढू बुद्रुकसाठी जादा बसेसचे नियोजन

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त पीएमपीएमएलकडून वढू बुद्रुकसाठी जादा बसेसचे नियोजन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रुक येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नागरिक व भाविक दर्शनासाठी येतात. यंदाही ११ मार्च २०२६ रोजी पुण्यतिथी निमित्त मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) कडून विशेष जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.
भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी पुणे महानगरपालिका भवन, स्वारगेट, हडपसर, भोसरी आणि निगडी या प्रमुख ठिकाणांहून वढू बुद्रुक येथे जाण्यासाठी एकूण १४ जादा बससेवा चालविण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीएमएल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या विशेष बससेवेमुळे नागरिकांना पुण्यतिथी कार्यक्रमासाठी वढू बुद्रुक येथे पोहोचणे सोयीचे होणार आहे. पुणे शहरातील विविध भागांतून सकाळपासून सायंकाळपर्यंत बससेवा उपलब्ध राहणार असून काही मार्गांवर रात्रीपर्यंत बससेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.
जादा बससेवा मार्ग पुढीलप्रमाणे
पुणे मनपा भवन – वढू बुद्रुक (मार्ग क्र. ३१)
पहिली बस : सकाळी ६.००
शेवटची बस : सायंकाळी ४.३०
स्वारगेट – वढू बुद्रुक (मार्ग क्र. ३३)
पहिली बस : सकाळी ६.५०
शेवटची बस : सायंकाळी ५.३०
हडपसर – वढू बुद्रुक (मार्ग क्र. ३४)
पहिली बस : सकाळी ७.४५
शेवटची बस : सायंकाळी ५.१५
भोसरी – वढू बुद्रुक (मार्ग क्र. ४१)
पहिली बस : सकाळी ६.३०
शेवटची बस : सायंकाळी ४.४५
निगडी – वढू बुद्रुक (मार्ग क्र. ४२)
पहिली बस : सकाळी ७.२०
शेवटची बस : सायंकाळी ५.३०
प्रत्येक मार्गावर ठराविक अंतराने बससेवा चालविण्यात येणार असून नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन्स) यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रुक येथे येणाऱ्या नागरिकांना वाहतुकीची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेत मॉलबाहेर गोळीबार; सोशल मीडिया पोस्ट याला लॉरेन्स बिश्नोई टोळीशी जोडतात

रावेत येथील एजे फर्निचर मॉलच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली. पुणे : शुक्रवारी रात्री ९.२० च्या सुमारास रावेत येथील एजे फर्निचर मॉलच्या बाहेर अज्ञातांनी...

जानेवारी-मार्च तिमाहीत पुण्यातील गोदामांचे भाडे उत्पादन क्षेत्रातील मागणीनुसार 6% वाढले

पुण्यातील गोदाम भाडेतत्वावरील क्रियाकलापांचा एक महत्त्वाचा भाग चाकण आणि तळेगावमध्ये केंद्रित आहे. पुणे : उत्पादन क्षेत्रातील मागणीमुळे पुण्यातील गोदामांचे सरासरी भाडे जानेवारी ते...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला. पुणे बातम्या

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

NEET-UG पेपर लीक प्रकरणी सीबीआयने पुण्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाला दिल्लीतून अटक केली

NEET-UG पेपर लीक प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेली ब्युटी पार्लरची मालक मनीषा वाघमारे ही देखील पुण्यातील कात्रजजवळील सुखसागरनगर येथील गंगा ओसियन पार्क सोसायटीची...

error: Content is protected !!