पुणे: महिलेला धमकावून जमीन बळाकाविण्याचाप्रयत्न करणारा हडपसरमधील सय्यदनगर भागातीलगुंड टिपू पठाण याच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्रसंघटितगुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचेआदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेटिपू पठाण याची हडपसर भागातील सय्यदनगर भागात दहशत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे, खंडणी मागणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पठाण याच्यासह साथीदारांविरुद्ध दाखल आहेत. पठाणने एका महिलेला धमकावून तिची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी त्याच्यासह साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल केला होता. पठाण याने एका कार्यक्रमात नोटांची उधळण करुन समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित झाली होती. पोलिसांनी पठाण आणि साथीदारांची धिंड काढली होती, तसेच त्याने कोणाला धमकावले असल्यास तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. पठाण याच्यासह साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्याचा प्रस्ताव काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी तयार केला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंजूरी दिली.त्यानंतर रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण (वय ३४, रा. ख्वाजा मंझिल, सय्यदनगर, हडपसर) याच्यासह एजाज सत्तार पठाण (वय ३९), नदीम बाबर खान (वय ४१), सद्दाम सलीम पठाण (वय २९), एजाज युसूफ इनामदार-पटेल (वय ३३), इरफान नासीर शेख (वय २६), साजीद नदाफ (वय २६, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाईचे आदेश देण्यात आले

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























