Homeताज्या बातम्यापुणे पोलिसांचा सकारात्मक उपक्रम: अल्पवयीन मुलांच्या पुनर्वसनासाठी मानसिक आरोग्य कार्यशाळेचा समारोप

पुणे पोलिसांचा सकारात्मक उपक्रम: अल्पवयीन मुलांच्या पुनर्वसनासाठी मानसिक आरोग्य कार्यशाळेचा समारोप

पुणे, दि. 07 एप्रिल 2026 – पुणे पोलिस आणि टीएफसी – द फुल सर्कल संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या मानसिक आरोग्य कार्यशाळेचा यशस्वी समारोप व सन्मान सोहळा पार पडला.
ही कार्यशाळा लष्कर पोलीस स्टेशन अंतर्गत विधिसंघर्षित बालकांसाठी आयोजित करण्यात आली होती. सुमारे आठ आठवड्यांच्या कालावधीत चाललेल्या या उपक्रमात राग नियंत्रण (Anger Management) व आवेग नियंत्रण (Impulse Control) या महत्त्वाच्या विषयांवर विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान मुलांना त्यांच्या भावनांचे आकलन करून योग्य निर्णय घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कथा सांगणे, भूमिकानुभव, समूह चर्चा आणि कला-आधारित उपक्रमांद्वारे मुलांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यात आले.
या उपक्रमामुळे अल्पवयीन मुलांच्या वर्तनात व भावनिक जाणिवेत लक्षणीय सुधारणा दिसून आली असून त्यांनी दैनंदिन जीवनात सकारात्मक निर्णय घेण्याची क्षमता विकसित केली आहे. तसेच शिक्षणाची आवड, प्रामाणिक मार्गाने उपजीविका करण्याची तयारी आणि समाजात सन्मानाने जगण्याची इच्छा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुलांशी व त्यांच्या पालकांशी संवाद साधत, पोलिसांची भूमिका केवळ कायद्याची अंमलबजावणी न राहता पुनर्वसनाला प्राधान्य देणारी असल्याचे स्पष्ट केले.
या सन्मान सोहळ्यास पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहभागी मुलं व त्यांचे पालक तसेच टीएफसी संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच, भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबवून अधिकाधिक मुलांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा पोहोचवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

error: Content is protected !!