आषाढी पालखी सोहळ्याच्या तयारीसंदर्भात संयुक्त बैठक
पुणे – आषाढी वारी पालखी सोहळा २०२५ सुरळीतपणे पार पडावा, यादृष्टीने मा. आयुक्त, पुणे महानगरपालिका यांच्या निर्देशानुसार एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक बुधवार, दिनांक १८ जून २०२५ रोजी, सायं. ४.३० वा., मा. स्थायी समिती सभागृह, पुणे महानगरपालिका येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस पुणे शहर पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे महानगरपालिकेचे विविध विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा, पाणीपुरवठा, लाईटिंग आदी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:
पालखी मार्गावरील रस्त्यांची डागडुजी व साफसफाई तात्काळ पूर्ण करणे
मार्गावर स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याचे टँकर, आरोग्य पथक यांची नेमणूक
वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्त वाढविणे व पर्यायी मार्ग योजना
गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही व देखरेखीसाठी नियंत्रण कक्ष
पालखीच्या स्वागतासाठी सजावट, विद्युत रोषणाई व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
पुणेकर नागरिकांनी सहकार्य करावे व सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन पुणे महानगरपालिका व पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























