Homeताज्या बातम्यामोबाईल चोरीच्या गुन्हेगारास ०४ तासात पकडून ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त

मोबाईल चोरीच्या गुन्हेगारास ०४ तासात पकडून ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तत्पर कारवाई करत मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस अवघ्या ०४ तासांच्या आत ताब्यात घेत ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत श्रीराम निवास साईनगर भागामधील घरामधून एकूण ०७ मोबाईल फोन चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी दिनांक २७/०४/२०२६ रोजी चंदननगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १९९/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना तपास पथकातील अधिकारी व अंमलदार आरोपीचा शोध घेत होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे इरम उर्फ वेदांत गणेश चव्हाण, वय १९ वर्षे, रा. मांजरी, पुणे याच्यावर संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपीकडून दाखल गुन्ह्यातील एकूण ०७ मोबाईल फोन व इतर असा एकूण ६६,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच हा गुन्हा अवघ्या ०४ तासांत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
ही उल्लेखनीय कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-४ पुणे शहर श्री. सोमनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस स्टेशन श्री. नितेश बडगुजर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमोल धर, पुणे यांच्या सूचनेनुसार सहा. पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार टी.आर. लिंगण्णा, गुरव, डोंगरे, वेद्रे व लहाने यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
चंदननगर पोलिसांच्या या वेगवान कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हडपसरमध्ये बँकेच्या रिकव्हरी एजंटकडून थकित कर्जदाराला मारहाण; तिघांना अटक

हडपसरमध्ये बँकेच्या रिकव्हरी एजंटकडून थकित कर्जदाराला मारहाण; तिघांना अटक पुणे, दि. २८ एप्रिल २०२६ : हडपसर येथे इंडसइंड बँकेच्या रिकव्हरी एजंटांनी थकित क्रेडिट कार्ड कर्जदाराकडे कर्जापेक्षा...

सेवा हक्क दिनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा राज्यस्तरीय सन्मान

पुणे, दि. 28 एप्रिल: महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, 2015 ची प्रभावी अंमलबजावणी तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना जलद, पारदर्शक व सुलभ सेवा उपलब्ध...

मराठी न येणाऱ्या चालकांचे लायसन्स रद्द? पँजतन पवित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. हनीफ...

मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांचे लायसन्स रद्द करण्याच्या कथित निर्णयाविरोधात निवेदन; मुख्यमंत्री व पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पँजतन पवित्र संघटनेची तक्रार पुणे, दि. 28 एप्रिल: मराठी...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास | पुणे बातम्या

प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहादच्या विचारसरणीवर कृत्य...

मीरा-भाईंदरमधील हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूर:...

error: Content is protected !!