Homeक्राईमभिगवण पोलीसांची कामगिरी भिमा नदीच्या पात्रातील मच्छीमारांच्या बोटींचे इंजिन चोरणाऱ्या दोघांना अटक

भिगवण पोलीसांची कामगिरी भिमा नदीच्या पात्रातील मच्छीमारांच्या बोटींचे इंजिन चोरणाऱ्या दोघांना अटक

पुणे- भिगवण,: भिमा नदीच्या पात्रात मासेमारी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मच्छीमारांच्या बोटींचे इंजिन चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना भिगवण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 4 बोट इंजिन, एक लोखंडी बोट व इतर साधणे असा 8 लाख 30 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अशी माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.दत्तु हिरामन घटे, (वय- 38), रमेश हिरामन गव्हाणे, (वय 37), रा. दोघेहीवरखडे, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सी.सी.टी.व्ही. फुटेज, जी.पी.आर.एस व गोपनिय बातमीदार यांच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभारगाव, धुमाळवाडी, (ता. इंदापुर) गावच्या हद्दीतुन भिमा नदीच्या पात्रामध्ये अनिल नामदेव धुमाळ, (रा. कुंभारगाव, ता. इंदापुर) यांच्या मालकिची मासेमारी करण्यासाठी वापरणारी होंडा कंपनीची 5 एच.पी 160 सी.सी बोटचे इंजीन कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरू नेल्याची घटना सोमवारी (ता. 27) सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी धुमाळ यांनी भिगवण पोलीस ठाण्यात इंजीन चोरी झाल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात दिली होती.सदर घटनेचा भिगवण पोलीस तपास करीत असताना सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी यांचे सी.सी.टी.व्ही. फुटेज, जी.पी.आर.एस व गोपनिय बातमीदार यांच्या मदतीने माहीती काढुन दत्तु घटे व रमेश गव्हाणे यांचा शोध घेऊन ताघेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच अधिक चौकशी केली असता त्यांनी इतर गुन्हे केल्याची कबुली दिली.दरम्यान, सदर गुन्हयातील आरोपी यांच्याकडून चोरीस गेलेले 4 बोट इंजिन, 1 लोखंडी बोट व इतर साधणे असा 8 लाख 30 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण जर्दे, पोलीस अंमलदार विठ्ठल वारगड, पांडुरंग गोरवे, सुभाष गायकवाड, प्रसाद पवार, सचिन पवार, रणजित मुळीक, यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार विठ्ठल वारगड करीत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निलंबित मोहल्ला समितीच्या बैठकीचे नूतनीकरण करा, पुण्यातील रहिवासी पीएमसीला सांगतात. पुणे बातम्या

पुणे: 'मोहल्ला' या शब्दाचा अर्थ त्याच्या व्याख्येनुसार जवळचा, परिसर-आधारित सामाजिक एकक आहे. शहरी प्रशासनाच्या यंत्रणेतील एक महत्त्वाचा घटक, हे युनिट 'मोहल्ला कमिटी' बैठकीच्या दशकानुवर्षे...

वडगावशेरी नागरी मेळाव्यात यांत्रिकी कचरा संकलन, विलगीकरणाचे नवीन नियम केंद्रस्थानी आहेत. पुणे बातम्या

पुणे: घनकचरा व्यवस्थापन (SWM) विभागाचे प्रमुख असलेले PMC उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत वडगावशेरीच्या रहिवाशांनी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्या मांडल्या...

बारामतीजवळ २.४ कोटी किमतीचा ४७९ किलो गांजा जप्त | पुणे बातम्या

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर बारामतीजवळील जळोची गावातील एका शेतात दोन बंद ड्रममध्ये ठेवलेला 479 किलो गांजा जप्त केला....

सार्वजनिक मार्गात अडथळा आणल्याप्रकरणी 40 हून अधिक फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे: डेक्कन जिमखाना पोलिसांनी शनिवार आणि रविवारी जेएम रोड, एफसी रोड, भांडारकर रोड, कमला नेहरू पार्कजवळ, शिरोळे रोड, कर्वे रोड आणि खिलारेवाडी रोडवरील फूटपाथ...

सहा जणांवर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे : मित्र मंडळ चौकाजवळ शुक्रवारी रात्री उशिरा मित्र मंडळ चौकाजवळ 20 वर्षीय अन्न वितरण एजंटचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी तीन 19...

error: Content is protected !!