Homeताज्या बातम्या​मौजमजेसाठी गाड्या चोरणारा गजाआड; आंबेगाव पोलिसांकडून ३ मोटारसायकल जप्त

​मौजमजेसाठी गाड्या चोरणारा गजाआड; आंबेगाव पोलिसांकडून ३ मोटारसायकल जप्त

पुणे:
केवळ स्वतःच्या मौजमजेसाठी मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला आंबेगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी एकूण तीन चोरीच्या मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
​अशी झाली कारवाई
​दिनांक २०/०६/२०२६ रोजी आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक अनुषंगाने पोलीस पथक पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलीस अंमलदार सचिन गाडे व प्रमोद भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. आंबेगाव पोलीस स्टेशन गु.र. नं २८४/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) मधील चोरीस गेलेली मोटारसायकल घेऊन एक इसम जांभुळवाडी तलावाजवळ बसला आहे, अशी माहिती मिळताच तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक युवराज शिंदे व पोलीस अंमलदारांनी तातडीने जांभुळवाडी तलाव येथील मोकळ्या जागेत छापा टाकला.
​तिथे एका मोटारसायकलवर संशयास्पद रित्या बसलेल्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव अजय मर्याप्पा जावीर (वय २९ वर्षे, रा. दुर्गामाता मंदिराचे मागे, हनुमाननगर, शनिनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे) असे सांगितले.
​सखोल चौकशीत गुन्ह्याची कबुली
​आरोपी अजय जावीर याच्याकडे पोलिसांनी सखोल व कसून चौकशी केली असता, त्याने ताब्यात असलेली मोटारसायकल ही दि. १४/०६/२०२६ रोजी शनिनगर चौक येथील ‘हरिओम हार्डवेअर’ समोरून चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी तातडीने सदर गुन्ह्यातील मोटारसायकल जप्त केली. अधिक तपासात त्याने भारती विद्यापीठ परिसर आणि पुणे स्टेशन परिसरातून देखील मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीच्या एकूण ३ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
​मार्गदर्शन व कामगिरी करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार
​सदरची धडक कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर) श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-२, पुणे शहर) श्री. मिलींद मोहिते, आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (भारती विद्यापीठ विभाग) श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
​तसेच आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चांगदेव सजगणे यांच्या थेट सूचनांनुसार या कारवाईत खालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली:
​पोलीस उप-निरीक्षक: युवराज शिंदे
​पोलीस अंमलदार:
​चेतन गोरे
​हणुमंत मासाळ
​हरीश गायकवाड
​निलेश जमदाडे
​धनाजी धोत्रे
​सचिन गाडे
​प्रमोद भोसले
​नितीन कातुर्डे
​योगेश जगदाळे
​सुभाष मोरे
​अजय कामठे
​ज्ञानेश्वर चित्ते
​राकेश टेकवडे
​शिवाजी पोटोळे
​फिरोज शेख
​या यशस्वी कामगिरीमुळे आंबेगाव पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​पुणे पोलिसांची मोठी कारवाई: कुख्यात निलेश घायवळ टोळीतील मोक्का आणि मर्डर गुन्ह्यातील फरार गुंड...

पुणे, २५ जून २०२६: पुणे शहर पोलिसांच्या कोथरूड पोलीस ठाण्यातील तपास पथकाने धडक कारवाई करत कुख्यात निलेश घायवळ टोळीतील एका सराईत आणि पाहिजे असलेल्या गुंडाला...

केतन अग्रवाल खून प्रकरण: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी सरकारला एसआयटी स्थापन करण्यास सांगितले. पुणे बातम्या

महाराष्ट्र विधानसभेचे पीठासीन अधिकारी राजू खरे यांनी गुरुवारी राज्य सरकारला पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन...

लोहगड किल्ला हत्याकांड: केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर ‘प्रेमी’ सिया गोयल-चेतन चौधरी आता एकमेकांकडे बोटे दाखवत...

केतन अग्रवाल (आर), सिया गोयल (सी), चेतन चौधरी (एल) पुणे: पुण्याचे रिअल इस्टेट संचालक केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरून कथितरित्या त्याच्या मृत्यूस ढकलल्यानंतर,...

केतन अग्रवाल: 2,004 कॉल, 238 तास आणि 1 अंतिम ‘सिग्नल’: केतन अग्रवालची हत्या युनेस्कोच्या...

पुणे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे की रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूमागील कथित षडयंत्र अनेक महिन्यांच्या गुप्त संवाद, अनेक बैठका आणि त्यांना...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

error: Content is protected !!