Homeताज्या बातम्याराहुरी येथील प्रियकराचा गंगापूर येथील प्रियसी कडून खून

राहुरी येथील प्रियकराचा गंगापूर येथील प्रियसी कडून खून

राहुरी येथील प्रियकराचा गंगापूर येथील प्रियसी कडून खून

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965

राहुरी तालुक्यातील जांभुळबन येथील भाऊसाहेब बाचकर याने त्याची गंगापूर येथील प्रियसी जयश्री चव्हाण हिच्या सोबत राहण्यास नकार दिल्याने प्रियसीने भाऊसाहेब बाचकर याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना संगमनेर येथे दि. १२ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.
संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील शिवप्रभा ट्रस्टमध्ये एका तरुणाचा १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात घारगाव पोलिसांना यश आले. मयताच्या प्रेयसीने प्रियकर सोबत राहत नसल्याच्या कारणावरुन खून केला असल्याचे उघड झाले आहे. या घटने नंतर उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, घारगावचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उप निरीक्षक अजय कौटे, आदिनाथ गांधले, पोहेकॉ. दत्तू चौधरी, पोकॉ. सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, महादेव हांडे, महिला पोकॉ. अमृता नेहरकर असे घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक, फिंगर प्रिंट, फॉरेंसिक यूनिट पाचारण करण्यात आले होते. प्रेताची ओळख पटवत असताना ते भाऊसाहेब विठ्ठल बाचकर (रा. जांभुळबन, ता. राहुरी) याचे असल्याचे समजले. त्यानंतर मयत भाऊसाहेबची पत्नी व नातेवाईक यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले, की भाऊसाहेब बाचकर व जयश्री काकासाहेब चव्हाण (रा. काटेपिंपळगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्यामध्ये मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याने तेव्हा पासून दोघेही अहिल्यानगर येथे राहत होते. दरम्यान ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास भाऊसाहेब हा पत्नी व मुला बाळांना भेटण्यासाठी साकूर येथे आला होता. तेव्हा त्याच्या सोबत जयश्री देखील होती. तेव्हा पत्नी योगिता बाचकर हिस साकूर येथे बोलावून घेवून सांगितले, मला आता जयश्री सोबत राहायचे नाही. यापुढे तुझ्या सोबत राहणार आहे. याचा राग आल्याने जयश्री ही भाऊसाहेब यास म्हणाली, तुम्हाला माझ्या सोबत राहावे लागेल नाहीतर मी तुम्हाला जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यानंतर भाऊसाहेब यास जयश्री ही मोटारसायकलवरुन घेवून शिवप्रभा ट्रस्ट येथे गेली. त्यानंतर तिने टणक हत्याराने त्याच्या डोक्यावर वार करुन खून केला आणि तेथून पसार झाली होती. तपास करताना पोलीस उपनिरीक्षक अजय कौटे, पोकॉ. सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर व महिला पोकॉ. अमृता नेहरकर यांच्या पथकाला जयश्री काकासाहेब चव्हाण हिने तिचे पती काकासाहेब शंकर चव्हाण यास फोन करुन नेवासा फाटा येथे बोलविले असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन सदर ठिकाणी जावून जावून तिला ताब्यात घेण्यात आले असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शानाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उप निरीक्षक अजय कौटे, आदिनाथ गांधले, पोहेकॉ. दत्तू चौधरी, पोकॉ. सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, महादेव हांडे, महिला पोकॉ. अमृता नेहरकर, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोना. सचिन धनाड यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रोखीने अडचणीत असलेल्या पुणे कॅन्टने 120 वर्षे जुन्या एमजी रोड इमारतीचे व्यावसायिक रूपांतर करण्याची...

पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड (PCB) एमजी रोडवरील ऐतिहासिक मुख्यालय पुन्हा व्यावसायिक उपक्रमात बदलून सध्याचे आर्थिक संकट दूर करण्याचा विचार करत आहे.120 वर्षांहून अधिक काळाचा...

आयुष कोमकर खून प्रकरणात तुरुंगात असलेल्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर यांचा दुसरा जामीन अर्ज न्यायालयाने...

पुणे : विशेष न्यायाधीश (MCOCA) एसएस कंठाळे यांच्या न्यायालयाने 5 सप्टेंबर 2025 रोजी आयुष कोमकर (18) हत्येप्रकरणी तुरुंगवास भोगलेल्या नगरसेविका लक्ष्मी उदयकांत...

महिना उलटला, मंत्र्याने कृषी विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली. पुणे बातम्या

पुणे : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र लिहून 14 मार्च रोजी मृत्यू झालेल्या कृषी...

PAT पेपर लीक झाल्यानंतर SCERT ने 6 ऑनलाइन चॅनलविरोधात तक्रार दाखल केली. पुणे बातम्या

पुणे : परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पीएटी) III च्या प्रश्नपत्रिका प्रसारित केल्याच्या आरोपावरून व्हिडिओ-सामायिकरण प्लॅटफॉर्मवर सहा चॅनेलच्या संचालकांविरुद्ध मंगळवारी गुन्हा...

पीएमसीच्या १३ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद भाजपकडे; राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे....

पुणे: जानेवारी महिन्यात झालेल्या पीएमसी निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने 15 पैकी 13 प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळवून नागरी प्रशासनावरील आपले नियंत्रण आणखी...

error: Content is protected !!