Homeताज्या बातम्यालोकमान्य हॉस्पिटलला 'रुग्ण हक्क संघर्ष समिती'चा दणका; ३.७५ लाखांचे बिल माफ, मृतदेह...

लोकमान्य हॉस्पिटलला ‘रुग्ण हक्क संघर्ष समिती’चा दणका; ३.७५ लाखांचे बिल माफ, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

पुणे | दि. ०९ मे २०२६
पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलच्या कथित चुकीच्या उपचार पद्धतीमुळे आणि बिलासाठी मृतदेह अडवून ठेवल्याप्रकरणी ‘रुग्ण हक्क संघर्ष समिती’ने आक्रमक पवित्रा घेत रुग्णालय प्रशासनाला नमविले. समितीच्या मध्यस्थीनंतर रुग्णालयाने तब्बल ३,७५,००० रुपयांचे जादा बिल माफ केले असून, मयत रुग्णाचा मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या स्वाधीन केला.
​नेमके प्रकरण काय?
​कै. भारत विश्वनाथ कुलकर्णी यांना २४ एप्रिल रोजी ब्रेन ट्युमरच्या उपचारासाठी लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णास दाखल करताना प्रशासनाने साधारण ४ लाख रुपये खर्च येईल असे सांगितले होते. नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे, सुरुवातीला रीतसर ॲडव्हान्स भरून उपचार सुरू झाले. मात्र, “आजाराचे स्वरूप डोक्याचे असताना उपचार पोटाचे केले जात आहेत,” असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला.
​दुर्दैवाने, उपचारादरम्यान ९ मे रोजी पहाटे ३ वाजता रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने बिलाची उर्वरित रक्कम भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला, अशी तक्रार नातेवाईकांनी रुग्ण हक्क संघर्ष समितीकडे केली.
​संघर्ष समितीचा मध्यस्थी आणि दणका
​या घटनेची माहिती मिळताच रुग्ण हक्क संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष संजयभाऊ बावळेकर यांनी सकाळी ७ वाजता कार्यकर्त्यांसह रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला शासन परिपत्रकाची आठवण करून दिली आणि सांगितले की:
​बिलापोटी मृतदेह अडवून ठेवणे हे बेकायदेशीर आणि मानवी हक्कांचे उल्लंघन आहे.
​दिलेल्या कोटेशनप्रमाणे नातेवाईकांनी आधीच रक्कम भरलेली आहे.
​जर मृतदेह तत्काळ सोडला नाही, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
​३.७५ लाखांची सवलत
​समितीचा आक्रमक पवित्रा आणि कायद्याचा बडगा पाहून रुग्णालय प्रशासन नमले. अखेर प्रलंबित असलेले ३ लाख ७५ हजार रुपयांचे बिल पूर्णपणे माफ करण्यात आले आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
​”रुग्ण दगावल्यानंतर त्याचे बिल थकले म्हणून मृतदेह अडवून ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. रुग्णालयांनी संवेदनशीलता जपायला हवी.”
— संजयभाऊ बावळेकर, प्रदेशाध्यक्ष, रुग्ण हक्क संघर्ष समिती.
​यावेळी समितीचे जिल्हा संघटक किरण बरे, उपशहर प्रमुख अमीर शेख, प्रशांत कुमावत, हेमंत गवळी, सागर उपासनी, राजेश सुलाखे, अमित मानकर, प्रमोद देशमाने, राहुल ताटे, अमर जगताप आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. न्याय मिळाल्याबद्दल कुलकर्णी कुटुंबाने समितीचे आभार मानले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​कर्बलाच्या शहीदांच्या स्मरणार्थ एकतेची मिसाल: मोहरमच्या रात्री पुण्यात सरबतासाठी मोफत साखर वाटप

​पुणे, दि. २५ जून २०२६: मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना 'मोहरम'च्या नवव्या दिवशी, म्हणजेच 'कत्तलची रात्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रात्री, 'पंजेतन पवित्र संघटना, महाराष्ट्र राज्य' यांच्या...

मुंबई लोकल हत्या: ‘सोशल मीडिया ट्रायल’मुळे आमच्या आयुष्यावर, नोकऱ्यांवर परिणाम; असे आरोपीच्या कुटुंबीयांचे म्हणणे...

सोशल मीडिया ट्रायलमुळे आमचे जीवन आणि नोकऱ्यांवर परिणाम होत आहे, असे मुंबई लोकल ट्रेनवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचे नातेवाईक म्हणतात मुंबई: मुंबई लोकल ट्रेनमध्ये...

सोनम रघुवंशी तुरुंगातून बाहेर आल्याने सिया गोयलने केतन अग्रवालची हत्या केली: राजाची आई. पुणे...

पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येवर इंदूरचा खून झालेला व्यापारी राजा रघुवंशी यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, सोनम रघुवंशी...

मुंबई आणि पुण्यात पाणी साचल्याने सुप्रिया यांनी भाजपवर निशाणा साधला. पुणे बातम्या

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ताथवडे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक विस्कळीत...

‘तिने प्लॅन केला, नाही त्याने माझ्यावर जबरदस्ती केली’: पुणे रिअल्टरच्या खून प्रकरणात ट्विस्ट आणि...

गहुंजे रियाल्टर केतन अग्रवाल यांच्या खून प्रकरणाला नवे वळण लागले आहे - दोन आरोपी - त्याची मंगेतर सिया गोयल (सी) आणि तिचा 'पार्टनर'...

error: Content is protected !!