Homeताज्या बातम्यालोहक्रांती एक विचारधारा सामाजिक चळवळीच्या माध्यमातून लोहार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद...

लोहक्रांती एक विचारधारा सामाजिक चळवळीच्या माध्यमातून लोहार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई येथे यशस्वी साखळी उपोषण

कार्यकारी संपादक
सागर लोहार

लोहक्रांती एक विचारधारा सामाजिक चळवळीच्या माध्यमातून लोहार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई येथे यशस्वी साखळी उपोषण

लोहक्रांती एक विचारधारा सामाजिक चळवळीच्या माध्यमातून लोहार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार दि. २९/०६/२०२६ ते शुक्रवार दि. ०३/०७/२०२६ या कालावधीत मुंबई येथील आझाद मैदानावर पाच दिवसीय साखळी उपोषण आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाला महाराष्ट्रातील विविध जिल्हे, तालुके आणि गावांमधून लोहार समाज तसेच विविध सामाजिक संघटना, संस्था आणि प्रतिष्ठान यांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला.

उपोषणाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. श्री संजय शिरसाट साहेब यांनी शिष्टमंडळाला विधिमंडळ परिसरात बोलावून चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विधिमंडळाचे कामकाज सुरू असल्यामुळे नियोजित वेळेनुसार सविस्तर बैठक होऊ शकली नाही.

बुधवार दि. ०१/०७/२०२६ रोजी इतर मागासवर्गीय कल्याण विभागाचे सचिव मा. श्री आप्पासो धुळाज (भा.प्र.से.) यांनी मंत्रालयात शिष्टमंडळाची भेट घेऊन ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंदजी पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत तसेच सदस्य नियुक्ती संदर्भात लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.तसेच आदरणीय माढा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार श्री धनंजय पाटील साहेब यांनी विधिमंडळात लक्षवेधी प्रश्नोत्तरात लोहार समाजाच्या विविध मागण्या मांडल्या व लक्षवेधी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शस्त्र प्रमुख भीमा लोहार यांचे राष्ट्रीय स्मारकाचा मुद्दा उचलून धरला, आझाद मैदानावरती समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी साहेब यांनी उपोषणकर्त्याना भेट देऊन निवेदन स्वीकारले तुमच्या मागण्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीदेवेंद्र फडणंवीस साहेब यांच्या सोबत चर्चा करून न्याय देण्याचे आश्वासन दिले

गुरुवार दि. ०२/०७/२०२६ रोजी उपोषणाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. श्री गिरीश महाजन साहेब तसेच शिक्षण मंत्री मा. श्री दादासाहेब भुसे साहेब यांनी आझाद मैदानावरील उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी मा. श्री गिरीश महाजन साहेब यांनी लोहार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या मंत्रिमंडळात मांडण्याचा प्रस्ताव ठेवण्याचे आश्वासन दिले. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सोबत शिष्ट मंडळाची आणण्याची ग्वाही देत उपोषणकत्याऀना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. या उपोषणाला विधान परिषदेचे सदस्य, आमदार श्री म्हात्रे साहेब, आमदार श्री अभ्यंकर साहेब आमदार ,श्री प्रशांतजी भोईर साहेब. यांनीही लोहार समाजाच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले व त्यांनीही लवकरात लवकर महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत चर्चा करून तुमच्या मागण्या सोडण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन दिले

या साखळी उपोषणात सहभागी प्रमुख उपोषणकर्ते समाज भुषण सन्माननीय श्री ज्ञानेश्वरजी ठमके साहेब, समाजसेवक श्री प्रशांतजी लोहार माननीय श्री दादासाहेब कळसाईत साहेब प्रदेशाध्यक्ष विश्वकर्मा विकास सेवा संस्था ( जि. सोलापूर )सामाजिक कार्यकर्ते श्री पद्माकर जी खंडागळे साहेब ( जि रायगड ) श्री उदयजी पौमेंडकर साहेब ( मुंबई कुलाबा विभाग ) श्री युवराजजी खैरे साहेब तालुका उपाध्यक्ष तत्सम लोहार समाज जामनेर श्री सुरेशजी मांडवगडे ( सचिव वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती जमाती महासंघ नागपूर गडचिरोली ) श्री प्रवीणजी काताळकर श्री बाहर सूर्यवंशी मुंबई,सौ अपर्णाताई कदम सेवानिवृत्त मुख्याध्यापिका नेरळ ता. कर्जत ) सौ मीनाताई कदम (ज्येष्ठ समाजसेविका नेरळ ता. कर्जत ) श्री पुंडलिक सूर्यवंशी ( अध्यक्ष विश्वकर्मा लोहार समाज सेवा बहुउद्देशीय संस्था भुसावळ) तसेच लोहक्रांती विचारधारा सामाजिक संस्थापक श्री संजय भाऊ कोळंबेकर यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला

हे आंदोलन लोह क्रांती एक विचारधारा सामाजिक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय भाऊ कोळंबेकर यांच्या नेतृत्वाखाली झाले

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील तळागाळातील लोहार समाजातील बांधव- भगिनी, विविध संघटना संस्था व प्रतिष्ठान यांच्या एकजूटीमुळे आंदोलन यशस्वी ठरले समाजाच्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांसाठीचा हा लढा पुढील काळातही लोकशाही मार्गाने आणि अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील , असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

लोह क्रांती एक विचार धारा सामाजिक चळवळ मुंबई
श्री संजय भाऊ कोळंबेकर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘मृत्यूपासून अस्वस्थ’: केतन अग्रवाल यांच्या आजोबांना हृदयविकाराचा झटका आला, त्यांचे निधन. पुणे बातम्या

लोहगड किल्ल्यावर ज्यांच्या मृत्यूची कथित हत्या म्हणून चौकशी केली जात आहे अशा पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या आजोबांचा घटनेच्या आठवड्यांनंतर मृत्यू झाला आहे....

केतन अग्रवालच्या हत्येतील ‘स्नॅपचॅट’ क्लू: सिया गोयलने चेतनला दोष दिल्याच्या काही दिवसांनंतर, तिच्या ‘मजकूर’मध्ये...

अग्रवालच्या कुटुंबियांनी उदयपूरमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या लग्नासाठी ट्रॅव्हल बुकिंग करण्यासाठी नातेवाईक आणि मित्रांकडून आधार तपशील मागवायला सुरुवात केली असतानाच हा संदेश पाठवण्यात आला. पुणे:...

खडकवासला सर्कल धरणात 24 तासांत 0.50 टीएमसी वाढ झाल्याने शहराची 10 दिवसांची पाण्याची गरज...

पुणे : खडकवासला सर्कलच्या चार धरणांमधील सामूहिक साठा शनिवारी 0.50 टीएमसीने वाढला - शहराची 10 दिवसांची पाण्याची गरज भागवण्यासाठी पुरेसा - कारण...

50 हून अधिक झाडे पडण्याची प्रकरणे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अंगठ्यावर ठेवतात. पुणे बातम्या

शुक्रवारी रात्री जोरदार वाऱ्याने सेनापती बापट रोडवरील एक मोठे झाड उन्मळून उभ्या असलेल्या कारवर आदळून वाहनाचे नुकसान झाले. पुणे : अविरत पावसाने शनिवारी...

एमएसआरटीसीचे वेळापत्रक नाणेफेकीसाठी जाते कारण पाणी साचणे आणि जाम टोल घेतात; कॅब चालकांना मोजकेच...

पुणे-मुंबई कॉरिडॉर, राज्याच्या सर्वात व्यस्त इंटरसिटी मार्गांपैकी एक, दररोज सुमारे 800 MSRTC ट्रिप पाहतो पुणे : शनिवारी पावसाळ्यात पाणी साचल्याने आणि जाममुळे पुणे-मुंबई...

error: Content is protected !!