पुणे : विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी करून सुमारे १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई विमानतळ पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासातून उघडकीस आणली.
दि. 20/04/2026 रोजी फिर्यादी यांनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार विमानतळ पोलीस स्टेशन येथे दिली होती. त्यानुसार गुन्हा रजि. नं. 233/2026 भा.दं.सं. कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोविंद जाधव यांनी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना तपासाची जबाबदारी दिली. तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश जोगदंड व लाडु कन्हे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर आरोपी राजेश पुरुषोत्तम बोकडे (वय 40 वर्षे, रा. कलवड वस्ती, लोणावळा, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपीने चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून सुमारे 15,00,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त परि. 04 पुणे शहर श्री. मनोज पाटील, तसेच मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन श्री. गोविंद जाधव व पोलीस निरीक्षक (गुन्हे) विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. शरद शेलके यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने ही कारवाई केली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्यासह पोलीस अंमलदार लाडु कन्हे, अंकुश जोगदंड, राहुल जोशी, रफिक शेख, योगेश घारे, सचिन मांजरे, आबासाहेब चव्हाण, हरीभाऊ गुंडे व प्रशांत सुतार यांनी सहभाग घेतला. �
👉 या कारवाईमुळे विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























