साई जीवन गौरव समाजभूषण पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चे संपादक शिवाजी दवणे
शिर्डी | प्रतिनिधी
ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “साई जीवन गौरव समाजभूषण पुरस्कार” सोहळा पवित्र शिर्डी नगरीत मोठ्या उत्साहात पार पडला. या भव्य कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुदाम संसारे हे होते.
या सोहळ्यात क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चे संपादक शिवाजी दवणे, शिक्षक संजय इघे सर, शिक्षक प्रभाकरजी लाड सर, लोहार समाजातील समाजसेवक गणेश भालके (राहुरी) तसेच पत्रकार व समाजसेवक विवेक ननवरे (नेवासा) यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत साई जीवन गौरव समाजभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे संपादक शिवाजी दवणे
हे केवळ लोहार समाजापुरतेच नव्हे, तर कोणत्याही समाजातील गरजू व्यक्तीसाठी निस्वार्थपणे मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. अपघात, आपत्ती किंवा सामाजिक प्रश्न असो – ते स्वतः घटनास्थळी जाऊन मदतकार्य करत असतात. समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी आणि सत्य पत्रकारितेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना निस्वार्थ व उत्कृष्ट पत्रकार म्हणून गौरविण्यात आले.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे संजय इघे सर व प्रभाकरजी लाड सर यांनी शिक्षक म्हणून आपल्या कर्तव्याचे भान ठेवत अत्यंत प्रामाणिकपणे कार्य केले आहे. कमीत कमी रजा घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने झटणाऱ्या या दोन्ही शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोहार समाजातील गोरगरीब व वंचित घटकांसाठी सातत्याने कार्य करणारे गणेश भालके व विवेक ननवरे यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. केवळ लोहार समाजच नव्हे, तर सर्व समाजातील गरजू नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना उत्कृष्ट समाजसेवक म्हणून सन्मानित करण्यात आले.
या पाचही मान्यवरांना “लोहार समाजाची बुलंद तोफ, आन-बाण-शान” म्हणून संबोधत पाच पांडव या सन्माननीय उपाधीसह साई जीवन गौरव समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोहार समाजाच्या इतिहासात प्रथमच पाच जणांना एकाच वेळी एवढा मोठा सन्मान मिळाल्याने समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पुरस्कारामुळे केवळ राहुरी तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात लोहार समाजाचे नाव गौरवाने घेतले जात आहे. पुढील काळात समाजातील निरक्षर, बेघर, आर्थिक अडचणीत असलेले तसेच उद्योगधंद्यापासून वंचित घटक यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवर अधिक जोमाने कार्य करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
हा पुरस्कार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरून समाजकार्य, शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रात नव्या कार्यकर्त्यांना दिशा देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























