Homeताज्या बातम्यासारसबाग बंद - मुस्लिम समाजाच्या हक्कांवर गदा; महापालिकेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

सारसबाग बंद – मुस्लिम समाजाच्या हक्कांवर गदा; महापालिकेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

पुणे महापालिकेने ईद-उल-अजहा (बकर ईद) च्या दुसऱ्या दिवशी, दिनांक ८ जून रोजी, सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, हा निर्णय मुस्लिम समाजाच्या मूलभूत नागरी हक्कांवर अन्यायकारक असल्याचे मत अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरी संघटनांनी मांडले आहे.

या संदर्भात राजकीय विश्लेषक, अर्थतज्ज्ञ आणि सामाजिक विचारवंत अन्वर शेख यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेच्या पक्षपाती भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जर मुस्लिम समाजाकडून मनपाला टॅक्स भरला जातो, तर त्यांना सार्वजनिक बागा, उद्याने वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे. एक खासदाराच्या तोंडी सूचनेवरून सार्वजनिक बाग बंद करणे, ही लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात जाणारी कृती आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

ईदच्या दुसऱ्या दिवशी अनेक मुस्लिम कुटुंबे आपल्या मुलांसह फिरण्यासाठी सारसबाग आणि इतर बागांमध्ये जातात. या दिवसाचे महत्त्व सामाजिक सलोखा, कौटुंबिक आनंद आणि परस्पर स्नेह वृद्धिंगत करणारे असते. मात्र, यावर्षी विशेष कारण न देता फक्त एका लोकप्रतिनिधीच्या सूचनेवरून सारसबाग बंद ठेवण्यात आले, ही घटना मन हेलावणारी असल्याचे नागरिक म्हणत आहेत.

अनुर शेख यांनी अधिकृतरित्या मागणी केली आहे की:
1. पुणे महापालिकेने सारसबाग बंद ठेवण्यामागील कारण स्पष्ट करावे.
2. भविष्यात कोणत्याही धार्मिक समुदायाच्या भावना दुखावणारे निर्णय टाळावेत.
3. मुस्लिम समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी.
4. लोकप्रतिनिधीच्या दबावात येऊन सार्वजनिक सुविधा बंद करू नयेत.

ही घटना एकाच धर्माच्या नागरिकांना लक्ष्य करत असल्याची भावना समाजात निर्माण होत असून, या प्रकारामुळे सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निरीक्षण आहे.

सार्वजनिक ठिकाणे ही सर्व नागरिकांसाठी खुली असावी, हाच लोकशाहीचा गाभा आहे. कोणत्याही धर्म, जाती किंवा वर्गावर अन्याय न होता सर्वांनी एकत्र, समान अधिकाराने जगावे, हीच खरी ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ची कल्पना आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोरेगाव पार्क पोलिसांनी 500 रुपयांच्या 300 बनावट नोटा जप्त, दोघांना अटक. पुणे बातम्या

पुणे : कोरेगाव पार्क पोलिसांनी रविवारी टिंगरेनगर आणि लोहेगाव येथील दोन आरोपींच्या भाड्याच्या घरांची झडती घेतल्यानंतर 500 रुपयांच्या 300 हून अधिक बनावट...

तीन जणांनी कॅब चालकावर हल्ला केला, कारची विंडस्क्रीन फोडली | पुणे बातम्या

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : महाळुंगे एमआयडीसी पोलिस तीन जणांचा शोध घेत आहेत ज्यांनी एका कॅब ड्रायव्हरला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण...

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी | पुणे बातम्या

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

पुणे शहरातील ट्रॅफिक जाममागील 60 पायाभूत आणि संबंधित समस्या पोलीस ओळखतात, सुधारात्मक उपायांसाठी पुणे...

वाहतूक सुरळीत करण्यासाठी खड्डे बुजवणे, सदोष रस्ता दुभाजक दुरुस्त करणे, फूटपाथची पुनर्रचना करणे आणि अतिक्रमणे हटवणे यासह उपाययोजनांची शिफारस पोलिसांनी केली आहे. पुणे...

फेसबुकवरील आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी नाजिया इलाही खान यांच्यावर कठोर कारवाईची ‘मुस्लिम सेवा संघ’ परवीन समीर...

पुणे: फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इस्लाम धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर साहेब व माँ बीबी आईशा यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह, अपमानजनक, चिथावणीखोर व बदनामीकारक शब्दांचा...

error: Content is protected !!