दिनांक:- २४/०१/२०२६
हज समितीचा अपमान सहन केला जाणार नाही!*
*मिस फरहा चैरिटेबल फाउंडेशन चा संताप सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध
*हजसारख्या पवित्र इस्लामी स्तंभावर नॉन-मुस्लिम CEOची नियुक्ती म्हणजे मुस्लिम समाजाच्या भावनांवर थेट घाला*
*डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख आणि अन्वर शेख यांचा सरकारला थेट इशारा*
पुणे |
महाराष्ट्र राज्य हज समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नॉन-मुस्लिम आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणे हे केवळ दुर्दैवी नाही, तर मुस्लिम समाजाच्या श्रद्धा, धर्म आणि घटनात्मक हक्कांवर थेट आघात करणारे आहे. हज हा इस्लाम धर्माचा पाच स्तंभांपैकी एक असून, अशा अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील संस्थेवर नॉन-मुस्लिम अधिकाऱ्याची नियुक्ती करणे हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे.
या निर्णयाचा मिस फरहा चैरिटेबल फाउंडेशन जाहीर निषेध करत असून, संस्थेच्या अध्यक्षा डॉ फरहा अन्वर हुसेन शेख आणि सामाजिक कार्यकर्ते अन्वर शेख यांनी सरकारच्या या कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
डॉ. फरहा शेख यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले,
*“हे अत्यंत लज्जास्पद आणि धक्कादायक आहे. हजच्या परंपरा, नियम, धार्मिक बाबी आणि शरियत समजणारा मुस्लिम व्यक्ती या पदासाठी असायलाच हवा. धर्माशी थेट संबंधित असलेल्या संस्थेवर नॉन-मुस्लिम व्यक्ती नेमणे म्हणजे हजच्या पवित्रतेचा अपमान आहे.”*
अन्वर शेख यांनी या विषयावर तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांच्या मौनावर कठोर टीका करत म्हटले,
*“जे पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मतं मागतात, ते आज मुस्लिम समाजाच्या इतक्या गंभीर मुद्द्यावर गप्प का आहेत? हे मौन म्हणजे या अन्यायाला मूक संमती आहे.”*
तसेच, त्यांनी Central State Hajj Committee Act चा संदर्भ देत सरकारच्या निर्णयावर थेट प्रश्न उपस्थित केला. या कायद्यानुसार, केंद्र व राज्य हज समित्यांमधील सदस्य व पदाधिकारी हे प्रामुख्याने मुस्लिम समाजातील असणे आवश्यक आहे. हा कायदा हज यात्रेचे व्यवस्थापन, यात्रेकरूंची निवड, प्रवासादरम्यान देखरेख आणि हज कोट्याची अंमलबजावणी यासाठी स्पष्ट चौकट देतो.
Maharashtra State Hajj Committee ही संस्था सौदी अरेबियाकडून मिळालेल्या हज कोट्याची अंमलबजावणी करते. दरवर्षी सुमारे १.७५ लाख भारतीय नागरिक हजसाठी जातात. अशा महत्त्वाच्या जबाबदारीच्या पदावर धार्मिक समज नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती करणे म्हणजे संपूर्ण व्यवस्थेची खिल्ली उडवण्यासारखे आहे.
अन्वर शेख यांनी ठाम शब्दांत इशारा दिला,
“निवडणुका संपल्यानंतर या नियुक्तीला कायदेशीर आव्हान दिले जाईल. मुस्लिम समाजाच्या हक्कांवर गदा आणणारा कोणताही निर्णय आम्ही शांतपणे स्वीकारणार नाही.”
मिस फरहा चैरिटेबल फाउंडेशन च्या वतीने सरकारला स्पष्ट संदेश देण्यात येतो की
हजसारख्या पवित्र धार्मिक विषयांमध्ये राजकीय हट्ट, प्रशासकीय अहंकार किंवा बहुसंख्याक मानसिकता चालणार नाही. मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्वातंत्र्याशी तडजोड केल्यास त्याविरुद्ध रस्त्यावर आणि न्यायालयात दोन्ही ठिकाणी ठोस लढा दिला जाईल.
संपर्क:
मिस फरहा चैरिटेबल फाउंडेशन
डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख
अन्वर शेख
मोबाईल: 8459867838

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























