Homeक्राईमकात्रजमध्ये जमिनीच्या वादातून शुभम चव्हाणचा खून करणाऱ्या अमर साकोरे सह चौघांच्या मुसक्या...

कात्रजमध्ये जमिनीच्या वादातून शुभम चव्हाणचा खून करणाऱ्या अमर साकोरे सह चौघांच्या मुसक्या आवळल्या जमिनीच्या वादातून तरुणाचा निर्घण खुन करणारे आरोपी जेरबंद; आंबेगाव पोलिसांनी २४ तासात सोलापूरहून केली चौघांना अटक

पुणे : जमिनीच्या वादातून तरुणाचा निर्घण खुन करुन पसार झालेल्या चौघांना आंबेगाव पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून २४ तासांच्या आत जेरबंद केले.अमर दिलीप साकोरे  (वय ४०, रा. संतोषनगर, कात्रज), मंदार मारुती किवळे  (वय ३५, रा. नवीन वसाहत, कात्रज), गिरीष सुभाष वावरे  (वय २६, रा. संतोषनगर, कात्रज) आणि योगेश बाबुराव डोरे (वय ३५, रा. खोपडेनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शुभम सुभाष चव्हाण (वय २८, रा कात्रज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत अमोल रामचंद्र चव्हाण (वय ४६, रा. गणेश पार्क, संतोषनगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास संतोषनगरमध्ये घडली होती.कात्रज येथील शुभम चव्हाण याच्या घराशेजारील जमिनीवरुन शुभम चव्हाण आणि अमर साकोरे यांच्यात वाद होता. त्यातूनच चौघा जणांनी लाकडी बांबु, स्टंपने शुभम चव्हाण याला मारहाण करुन त्याचा खुन केला. शुभम चव्हाण याचा खुन केल्यानंतर आरोपी पळून गेले होते. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी सहा पथके शोध घेत होते पोलिसांनी आरोपी निष्पन्न करुन तांत्रिक विश्लेषणाद्वारे ते मोहोळ तालुक्यातील कामती येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व पोलीस अंमलदार हणमंत मासाळ, धनाजी धोत्रे, नितीन कातुर्डे हे मोहोळ येथे गेले. तेथे तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतल्यावर ते मंगळवेढा ते सोलापूर महामार्गावरील समाधान हॉटेल समोर पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भोसरी येथे अपघातात एक ठार, दोन जखमी

पुणे : भोसरी येथील उड्डाणपुलावर ट्रिपल सीट चालवत असलेल्या मोटारसायकल दुभाजकाला धडकल्याने एका 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचे दोन पुरुष...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

राजा दिनकर केळकर संग्रहालय आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त पॉडकास्ट, कलाकृती आणि इतिहासासह

राजा दिनकर केळकर संग्रहालयात बसवण्यात आलेल्या सोलर पॉवर सिस्टीमचे उद्घाटन सोमवारी होणार आहे. पुणे : राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय सोमवारी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन...

सोपानबाग सोसायटीसाठी प्रवेश रस्ता एक सापळा

पुणे: सोपानबाग येथील ताराबाग परिसरातील अनिका एसेन्शिया सोसायटीतील सुमारे ३०० रहिवाशांना वर्षातील बहुतांश काळ त्यांच्याच घरात अडकल्याचे जाणवते. संपूर्ण पावसाळ्यात अनेक आठवडे, किंवा जेव्हा...

पाचगाव-पर्वती टेकडी वाचवण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन; भूमाफियांवर मोक्का कारवाईची मागणी

पुणे: भ्रष्टाचार मुक्त प्रशासन – माहिती अधिकार कार्यकर्ता एकता परिषदेच्या वतीने पुण्याचे पर्यावरण व पाचगाव-पर्वती टेकडी वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर दिनांक १८/०५/२०२५...

error: Content is protected !!