Homeताज्या बातम्याशिवाजीनगर पोलिसांचा पराक्रम : स्वातंत्र्य दिनी ४१ मोबाईलची परतफेड

शिवाजीनगर पोलिसांचा पराक्रम : स्वातंत्र्य दिनी ४१ मोबाईलची परतफेड

शिवाजीनगर पोलिसांचा पराक्रम : स्वातंत्र्य दिनी ४१ मोबाईलची परतफेड

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाला मोठे यश मिळाले असून, हरवलेले तब्बल ₹५ लाख किंमतीचे ४१ मौल्यवान मोबाईल संच विविध जिल्हे तसेच इतर राज्यांतून शोधून काढण्यात आले.

या मोबाईल संचांची परतफेड तक्रारदारांना परीमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त श्री. कृषीकेश रावले व सहाय्यक पोलीस आयुक्त (विश्रामबाग विभाग) श्री. साईनाथ ठोंबरे यांच्या हस्ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली.

तक्रारदारांनी आपले हरवलेले मोबाईल परत मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून पोलीस दलाचे आभार मानले.

तपासाची माहिती

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली
सपोनि संतोष पाटील, पोलीस अंमलदार तेजस चोपडे व आदेश चलवादी यांनी विशेष तांत्रिक तपास केला.
हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार करून, सततचा पाठपुरावा व तांत्रिक माहितीच्या आधारे संबंधित मोबाईल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये व इतर राज्यात वापरात असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर मोबाईल वापरकर्ते व संबधित पोलीस ठाण्याशी संवाद साधून मोबाईल परत मिळवण्यात आले.

नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना

मोबाईल हरवल्यास त्वरित तक्रार नोंदविण्यासाठी खालील प्रक्रिया करावी :

1. ऑनलाईन नोंदणी :
punepolice.gov.in/LostFoundReg

तक्रार नोंद करताना जवळचे पोलीस स्टेशन निवडावे.

नोंद झाल्यावर त्याची एक प्रत जवळच्या पोलीस स्टेशनला द्यावी.

2. CEIR पोर्टल नोंदणी :
ceir.gov.in

नवीन सिमकार्ड सुरु करून OTP द्वारे नोंदणी पूर्ण करावी.

मोबाईल खरेदी पावती, तक्रारीची प्रत, ओळखपत्र PDF स्वरूपात अपलोड करणे आवश्यक.

कारवाईत सहभागी अधिकारी

ही संपूर्ण कारवाई मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर,
मा. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त,
मा. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग,
मा. कृषीकेश रावले, पोलीस उपायुक्त परिमंडळ १,
मा. साईनाथ ठोंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच यामध्ये यपोनि महेश बोळकोटगी, पोनि (गुन्हे) धंनजय पिंगळे, सपोनि संतोष पाटील, मपोउप मनिषा बलसे, मपाहवा नलिनी क्षीरसागर, पोशि आदेश चलवादी, पोशि तेजस चोपडे, पोशि नवनाथ आटोळे यांचे विशेष योगदान राहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

error: Content is protected !!