Homeताज्या बातम्याशनिवारवाडा बिकट अवस्थेत : सुविधा नाहीत, दररोज लाखो महसूल असूनही नागरिक व...

शनिवारवाडा बिकट अवस्थेत : सुविधा नाहीत, दररोज लाखो महसूल असूनही नागरिक व पर्यटकांना त्रास – भ्रष्टाचाराचा संशय

पुणे :
पुणे शहराचे ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभव असलेला शनिवारवाडा आज अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. दररोज राज्यभरातून आणि परराज्यातून हजारो पर्यटक येथे भेट देतात. मात्र, त्यांच्या मूलभूत सोयींचा पूर्णतः अभाव असल्याने संताप व्यक्त होत आहे.

शनिवारवाड्यात शौचालय व बाथरूमची सुविधा नाही. परिसरात गवत वाढलेले असून स्वच्छतेचा अभाव जाणवतो. इतकेच नव्हे तर सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रवेशासाठी प्रत्येकी २० रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे दररोज लाखो रुपयांचा महसूल जमा होत असूनदेखील नागरिकांना कोणतीही सुविधा दिली जात नाही. त्यामुळे या रकमेचा अपहार होऊन भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत RTI अर्ज दाखल करून गेल्या तीन वर्षांत शनिवारवाड्यातील महसूल, खर्च, सुरक्षा रक्षकांची नेमणूक, स्वच्छता व शौचालय उभारणीसाठी झालेला खर्च याबाबत माहिती मागविण्यात आली आहे. तसेच स्वच्छतेसाठी व सुरक्षेसाठी कंत्राटी कंपन्यांना दिलेल्या रकमेचा तपशीलही मागवण्यात आला आहे.

पुणेकर व पर्यटकांची मागणी आहे की, शनिवारवाड्यात तातडीने शौचालय, स्वच्छता, सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा हा ऐतिहासिक वारसा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उड्डाणाला 14 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने प्रवाशांना त्रास होतो. पुणे बातम्या

पुणे: एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने लखनौ आणि दिल्लीला जाणाऱ्या १०० हून अधिक प्रवाशांना बुधवारी १४ तासांपेक्षा जास्त उशीर झाला.उड्डाण (IX-1618), मूळत: 4.30 वाजता निघणार...

भाजपवाले पुण्याच्या कोंढव्याचा उल्लेख पाकिस्तानचा कराची असा करतात; एफआयआर दाखल केला. पुणे बातम्या

पुणे: या आठवड्याच्या सुरुवातीला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये कोंढव्याचा "पाकिस्तानची कराची" असा उल्लेख केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप युवा शाखेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा...

​पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई; ट्रेडिंगच्या बहाण्याने १.४० कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला साताऱ्यातून बेड्या

​पुणे: शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तांत्रिक विश्लेषण...

महाराष्ट्र दिनी पुण्यात ‘पर्यावरण’ रणकंदन; ५२९ वारसा वृक्षांच्या कत्तलीविरोधात शेकडो पुणेकर रस्त्यावर

पुणे | १ मे २०२६: एकीकडे संपूर्ण राज्य महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करत असताना, पुण्यात मात्र पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. गणेशखिंड...

प्री-एसआयआर मतदार मॅपिंगमध्ये पुणे, मुंबई अजूनही मागे आहेत. पुणे बातम्या

सध्या सुरू असलेले प्री-स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मॅपिंग व्यायाम पुणे आणि मुंबईसह शहरांमध्ये संथ गतीने सुरू आहे, वरिष्ठ निवडणूक अधिकारी त्याचे श्रेय...

error: Content is protected !!