मराठवाडा जनविकास संघाकडून पोस्ट ऑफिस व सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीचा ‘पहिला मान’
समाजसेवेची पंधरा वर्षांची परंपरा जपत मराठवाडा जनविकास संघाने यावर्षीही दिवाळीचा पहिला मान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सफाई कर्मचारी व आरोग्य सेवक, पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना दिला. ‘आनंदाची दिवाळी, अगोदर कष्टकरी कामगार वर्गाची’ असे म्हणत पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, बेसिक पिन्सिपल वेस्ट व्हेंचर कंपनीचे कर्मचाऱ्यांना साड्या, कपडे आणि मिठाईचे वाटप
करण्यात आले.
पिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार , मनोज मोरे, धनाजी येळकर, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, सखाराम वालकोळी, अर्जुन खामकर, किशोर आटरगेकर, बळीराम कातंगळे, सतीश काळे, बालाजी पांचाळ, अनिताताई पांचाळ, राजेश सातपुते, शिवाजीराव घोडके, गोरख पाटील, लक्ष्मण जाधव, दिलीपराव बारडकर, महादेव करडे, सोमनाथ वैद्य, राहुल कांबळे, शाहूराज कदेरे आदी उपस्थित होते.
ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज म्हणाले, ज्यांच्या हातात झाडू आहे, त्यांच्याच हातात शहराचे आरोग्य आहे. त्यांच्यासाठी दिवाळीचा पहिला मान देणे ही खरी समाजसेवा आहे.
अरुण पवार म्हणाले, कष्टकऱ्यांचे जीवन सन्मानाचे व्हावे, ही आमची तळमळ आहे. समाजाच्या या आधारस्तंभांना आधार देणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे.
प्रास्ताविक वामन भरगंडे यांनी केले. त्यांनी गेल्या १५ वर्षांत संघाने केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेत कर्मचाऱ्यांच्या सन्मानाची परंपरा अधोरेखित केली.
आभार सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833




















